esakal | आशिष देशमुखांचा सरकारला घरचा आहेर, राज्यात आणीबाणी लागू करण्याची पंतप्रधानांकडे मागणी

बोलून बातमी शोधा

ashish deshmukh
आशिष देशमुखांचा सरकारला घरचा आहेर, राज्यात आणीबाणी लागू करण्याची पंतप्रधानांकडे मागणी
sakal_logo
By
टीम ई सकाळ

नागपूर : मागील एक वर्षात शासनाकडे वेळ होता. त्यांना राज्यातील प्रत्येक शहरामध्ये जम्बो हॉस्पीटल उभे करता आले असते. मला वाटते राज्याची आर्थिक परिस्थिती ठीक नाही. संविधानातील कलमानुसार आपण आणीबाणी लागू करू शकतो. आरोग्य आणि आर्थिक संदर्भातील ही आणीबाणी केंद्र सरकारने महाराष्ट्रात लागू करावी, अशी मागणी काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनी पंतप्रधानांकडे केली आहे.

हेही वाचा: कोरोनानंतर होतो डोळ्यांचा त्रास, 'या' समस्यांचा अनेकजण करताहेत सामना

दोन महिन्यासाठी ही आणीबाणी असेल. त्यानुसार लोकांचे जीव वाचविता येतील. लता मंगेशकर हॉस्पीटल माध्यमातून मागील वर्षी जवळपास तीन ते साडेतीन हजार रुग्ण आम्ही वाचवू शकलो. आज परिस्थिती अशी आहे, की ज्यांची ओळख आहे त्यांचेच जीव वाचत आहेत. ज्यांच्याकडे पैसा आहे, त्यांचेच जीव वाचतात. आता ग्रामीण भागात कोरोना शिरलाय. मात्र, राज्याकडून त्यांना सुविधा पुरविल्या जात नाहीत, असाही आरोप आशिष देशमुख यांनी केला.

दोन महिन्यासाठी देशाच्या ठराविक भूभागामध्ये संविधानातील३६० कलमाद्वारे आणीबाणी लावण्यात यावी. प्रत्येक माणसाला जगण्याचा अधिकार आहे. या आणीबाणीच्या काळात तो त्यांना मिळेल. त्यासाठी पंतप्रधानांना पत्र लिहून विनंती केली असल्याचेही ते म्हणाले.