esakal | कोरोनानंतर होतो डोळ्यांचा त्रास, 'या' समस्यांचा अनेकजण करताहेत सामना

बोलून बातमी शोधा

sore eyes corona symptoms
कोरोनानंतर होतो डोळ्यांचा त्रास, 'या' समस्यांचा अनेकजण करताहेत सामना
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : शहरातील कोविड रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. दरम्यान, आणखी एक माहिती समोर आली आहे. ज्यामुळे चिंता वाढली आहे. कोरोनातून मुक्त झालेल्या रुग्णांना बऱ्याच समस्यांचा सामना करावा लागत आहे. मोठ्या प्रमाणात डोळा दुखणे, खाज सुटणे आणि जडपणा अशा डोळ्यांच्या समस्या निर्माण होत आहेत.

हेही वाचा: गर्भवती मातांनो, कोरोना विषाणूंचा बाळाला धोका नाही; नियमाचं करा पालन

कोरोना होऊन गेल्यानंतर काही दिवसानंतर पोस्ट कोविड रुग्णालयात मोठ्या प्रमाणात रुग्ण येतात. यात ब्रोन्कियल रेटिनल व्हेन ओक्लुसेशन (बीआरव्हीओ) ज्याला सेंट्रल रेटिनल व्हेन ओक्लुझेशन (सीआरव्हीओ) आणि एन्टिक इस्केमिक ऑप्टिक न्यूरोपॅथी (एआयएन) या नेत्ररोगातील या समस्या दिसत आहेत. बीआरव्हीओ आणि सीआरव्हीओमध्ये डोळा दुखणे, खाज सुटणे आणि जडपणा यासारखे समस्या आहेत. तसेच एआयएन रोगामध्ये दूरवरील डोळ्यांची दृष्टी मिळण्यास वेळ लागतो. यामुळे डोळ्यातील पडद्यावर सूज येते. डोळे बंद केल्यावर डोळे उघडल्यानंतर त्रास होतो. डोळ्यांच्या खाली काळी वर्तुळ येतात. कोरोना होऊन गेलेल्या रुग्णांना मधुमेह किंवा उच्च रक्तदाब असेल तर त्यांना जास्त त्रास होतो. कोविड नंतर मधुमेह रुग्णांमध्ये थ्रोम्बोसिस जास्त आहे. थ्रोम्बोसिसमध्ये रक्त गोठण्याची समस्या दिसून येते. डोळ्याच्या बारिक नसांमध्ये देखील ही समस्या दिसून येते. डोळ्याच्या नसा ब्लॉक होतात.

कोरोना झाल्यानंतर रुग्णांना डोळ्यांत काही समस्या असल्यास त्याकडे लक्ष द्या. कोविड नंतर एकदा डोळ्यांची तपासणी करा. पूर्वी बीआरव्हीओ आणि सीआरव्हीओचे २ रुग्ण वर्षभरात येत होते. आता दोन महिन्यात ५ रुग्ण आले आहेत. एआयएनचे सुमारे ४०० रुग्ण आले. एआयएन रोगामध्ये डोळ्यांतील उजेड जाण्याची भीती असते. या सर्व रुग्णांना कोविड होऊन गेला. त्यातच त्यांना मधुमेहसारख्या सहव्याधी होत्या.
-डॉ. अजय अंबाडे, नेत्ररोग तज्ज्ञ, नागपूर.

अशा आहेत समस्या

  • डोळ्यांमध्ये वेदनांसह खाज

  • डोळ्यांतील पडद्यावर सूज