Congress Latest News I मोदी सरकारला लोकशाही नाही तर हुकूमशाही हवीय, कॉंग्रसेचा हल्लाबोल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

congress latest political News

सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना ईडीची नोटीस म्हणजे सूडबुद्धीने कारवाई

मोदी सरकारला लोकशाही नाही तर हुकूमशाही हवीय, कॉंग्रसेचा हल्लाबोल

मनी लॉंड्रींग प्रकरणी कॉंग्रसचे राहुल गांधी यांची ईडीकडून मागील तीन-चार दिवसांपासून चौकशी सुरु आहे. केंद्रीय संस्था भाजपच्या दडपशाहीला घाबरून ही चौकशी करत असल्या आरोप कॉंग्रसेने केला आहे. ईडीच्या चौकशीचा निषेध म्हणून कॉंग्रसने देशभर आंदोलन पुकारले आहे. दरम्यान, आता कॉंग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. (congress latest political News)

नॅशनल हेरॉल्डच्या व्यवहारामध्ये संपत्तीचे हस्तांतरण नाही, कोणत्याही पद्धतीचा लाभांश सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना मिळणार नाही, पगारही मिळत नाही. यामध्ये मनी लॉंड्रींग आले कुठून, असा सवाल करीत मोदी सरकारला लोकशाही मान्य नाही आणि त्यांना हुकूमशाही, हिटलरशाही करायची आहे, असा घणाघाती आरोप कॉंग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे (Atul Londhe) यांनी केला.

हेही वाचा: केतकी चितळेला ठाणे कोर्टाकडून जामीन, तरीही राहणारा जेलमध्ये

पुढे ते म्हणाले, सोनिया गांधी (Soniya Gandhi) आणि राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना ईडीची (ED) नोटीस म्हणजे सूडबुद्धीने कारवाई केली आहे. सत्तेचा अमर्याद गैरवापर करुन हिटलरशाही सुरू आहे. देशाचे मूळ मुद्दे राहुल गांधी लावून धरतात आणि मोदींच्या डोळ्यांत डोळे घालून बोलतात, अन् नेमकी हीच बाब त्यांना खटकते असल्याचा टोमणा त्यांनी दिला आहे.

कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर मोदींसमोर आवाज उठवला होता. त्यांनाही तेव्हा भाजपने टार्गेट केले नंतर नाना पटोलेंनी खासदारकीचा राजीनामा दिला, हे देशाने पाहिले. मोदींच्या समोर उभे राहून कुणी बोलले, तर त्यांना खपत नाही. त्यामुळेच देशात हा प्रकार त्यांनी सुरू केला आहे, असंही ते म्हणाले आहेत.

हेही वाचा: भाजप खासदाराचा राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांशी 'दोस्ताना'?

दरम्यान, महागाई, पेट्रोल-डिझेलचे वाढते दर, रुपयांची घसरण, अर्थव्यवस्थेची घसरण, वाढती बेरोजगारी, काश्मिरी पंडितांची हत्या व पलायन यामुळे देशात मोदी सरकारच्या विरोधात तयार झालेला असंतोष निर्माण झाला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर मोदी सरकारची झालेली बदनामी लपविण्यासाठी जनतेचे लक्ष इतरत्र वळवण्याकरिता काँग्रेस नेत्या सोनिया गांधी व राहुल गांधी यांना ईडीची नोटीस पाठविण्यात आल्याचा आरोप अतुल लोंढे यांनी केला आहे.

Web Title: Congress Leader Atul Londhe Criticized Pm Modi Does Not Want Democracy But Only Dictatorship

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top