
पुणे : शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी पोलिस खात्यात अतिरिक्त पोलिस आयुक्त (वाहतूक) पद निर्माण करून सक्षम अधिकाऱ्याची नेमणूक सरकारने करणे गरजेचे आहे. पण, ती नेमणूक करण्यासाठी कधी मुहूर्त लागणार? असा सवाल माजी आमदार आणि प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला आहे.