काँग्रेसची स्ट्रॅटेजी चुकली; प्रदेशाध्यक्षांच्या अंगलट आले धाडस

मंगेश देशमुख मोठ्या फरकाने पराभूत झाल्याने काँग्रेसची स्ट्रॅटेजी चुकल्याचे स्पष्ट होते
nana patole
nana patolesakal media
Updated on

नागपूर : उमेदवार वेळेवर बदलणे ही काँग्रेसची स्ट्रॅटेजी होती, असा दावा करणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) निवडणुकीच्या निकालानंतर तोंडघशी पडले. मंगेश देशमुख मोठ्या फरकाने पराभूत झाल्याने काँग्रेसची स्ट्रॅटेजी चुकल्याचे (Congress missed the strategy) स्पष्ट होते. पराभवानंतर घोडेबाजार झाल्‍याचा आरोप करून प्रदेशाध्यक्षांनी या वादातून सुटका करून घेण्यासाठी सोयीचा मार्ग निवडला आहे.

रवींद्र भोयर (Ravindra Bhoyar) यांना काँग्रेसमध्ये आणून आपण भाजपचा मोठा नेता तसेच रेशीमबागेतील कट्टर स्वयंसेवकाला फोडल्याचा दावा प्रदेशाध्यक्षांनी केला होता. त्यांना विधान परिषदेची उमेदवारी देऊन देशभरात खळबळ उडवून दिली होती. हा केंद्रीय मंत्री गडकरी (Nitin Gadkari) आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांना मोठा धक्का असल्याचे चित्र उभे केले.

nana patole
मुलांना विष देऊन आईचा आत्महत्येचा प्रयत्न; चिमुकला दगावला

भोयर यांच्यामुळे भाजपचे मोठी व्होटबँक फुटेल असाही कयास लावला. स्थानिक नेत्यांचा विरोध असतानाही पटोल यांनी भोयर यांची हमी घेऊन त्यांना एबी फॉर्म दिला. त्यामुळे सर्वांचे लक्ष या निवडणुकीच्या निकालाकडे लागले होते. भोयर यांच्या विषयीच्या तक्रारी वाढू लागल्या. ते मॅनेज आहेत, भाजपनेच त्यांना पाठवले अशाही अफवा पसरल्या.

काँग्रेसचे स्थानिक नेतेही प्रचारात फिरकत नव्हते. त्यामुळे संशय बळवला. भाजपचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुले एकतर्फी जिंकेल असे दिसू लागले. येथून पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी या निवडणुकीत एंट्री घेतली. त्यांनी स्थानिक नेते आणि मतदारांच्या दोन दिवस मॅरेथॉन बैठका घेतला. शेवटच्या क्षणी थेट उमेदवार बदलण्याच्या हालचाली सुरू केल्या.

nana patole
‘मिस ट्रान्स ग्लोबल २०२१’ स्पर्धा जिंकणारी श्रुती सितारा पहिली भारतीय

थेट दिल्ली हायकमांडकडे उमेदवार बदलण्याची मागणी केली. त्यावेळी मतदानाला दोन दिवस शिल्लक होते. इतक्या झटपट दिल्लीतून मंजुरी मिळणारच नव्हती. त्यामुळे प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी यांना समर्थनाचे पत्र काढायला लावले. पत्र आले तेव्हा सायंकाळ झाली होती. दुसऱ्या दिवशी मतदान होते. शेवटी जे व्हायचे तेच झाले. मात्र, केदार यांनी आपले वजन वापरून काँग्रेसची मते यानिमित्ताने शाबूत ठेवली. अन्यथा बावनकुळे यांनी चारशे मतांचा टप्पा गाठला असता.

सोमवारी (ता. १३) नाना पटोले यांनी उमेदवार बदलणे ही काँग्रेसची स्ट्रॅटेजी होती असे वक्तव्य केले. असे सांगून त्यांनी मोठी हवा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या वक्तव्यावरून चमत्कार घडेल, असे काँग्रेस भक्तांना वाटू लागले होते. मात्र, अवघ्या काही तासातच त्यांच्या स्ट्रॅटेजीचा फुगा फुटला. आता काँग्रेसमध्ये नेहमीप्रमाणे पुन्हा एकमेकांकडे बोट दाखवने सुरू झाले आहे.

nana patole
तुम्हालाही आहे पोटावर झोपण्याची सवय? होते मोठे नुकसान

कहीपे निगाहे कहीपे निशाना...

चंद्रशेखर बावनकुळे तीन दिवसांपूर्वी नाना पटोले यांच्या राजीनाम्याची मागणी केली. काँग्रेसच्या अंतर्गत वादात बोलण्याचा अधिकार नाही हे मुरब्बी असलेल्या बावनकुळे यांना ठावूक नाही, असे होऊच शकत नाही. विजयानंतरही प्रतिक्रिया देताना त्यांनी पटोले यांच्या राजीनाम्याची पुन्हा मागणी केली. ही लाईन काँग्रेसच्या एक बड्या नेत्याची आहे. त्यामुळे राजीनाम्याची मागणी करून पटोले यांच्यावर दुसराच कोणीतरी निशाना साधत असल्याचे दिसून येते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com