
Abhijit Wanjarri
sakal
नागपूर : काँग्रेसच्या आज झालेल्या बैठकीत अागामी विधान परिषदेच्या नागपूर पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार म्हणून आमदार ॲड. अभिजित वंजारी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. मागील निवडणुकीत काँग्रेसचे ॲड. वंजारी यांनी संदीप जोशी यांचा पराभव करून भाजपचा परंपरागत मतदारसंघ हिसकावून घेतला होता. वर्षभरानंतर होऊ घातलेल्या निवडणुकीत हा गड कायम राखण्यासाठी काँग्रेसने पुन्हा वंजारी यांच्यावर विश्वास दाखविला आहे.