esakal | 'राज्यपाल भाजप कार्यकर्ते अन् राजभवन पक्षाचे कार्यालय आहे का?'
sakal

बोलून बातमी शोधा

congress state president nana patole commented on governer koshyari in nagpur

१२ आमदारांची नियुक्ती कधी करणार? हे राज्यपालांनी सांगावे. राहिला प्रश्न अध्यक्षपदाचा तर अधिवेशनात मतदानाने ही प्रक्रिया होणार आहे, असेही पटोले म्हणाले.

'राज्यपाल भाजप कार्यकर्ते अन् राजभवन पक्षाचे कार्यालय आहे का?'

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नागपूर : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भूमिका राज्याला माहिती आहे. राज्यापाल हे भाजपचे कार्यकर्ता आणि राजभवन हे त्यांच्या पक्षाचे कार्यालय आहे का? असा निर्माण झाला आहे. राज्यापाल १२ आमदारांबाबात बोलायला तयार नाहीत. मात्र, त्यांना विधानसभा अध्यक्षपदाची घाई झाली आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले. आज ते नागपुरात बोलत होते.

१२ आमदारांची नियुक्ती कधी करणार? हे राज्यपालांनी सांगावे. राहिला प्रश्न अध्यक्षपदाचा तर अधिवेशनात मतदानाने ही प्रक्रिया होणार आहे, असेही पटोले म्हणाले.

पुजा चव्हाण प्रकरणी प्रश्न विचारला असता ते म्हणाले, सत्यता पुढे येत नाही तोपर्यंत अधिक बोलणे योग्य नाही. मात्र, याप्रकरणी भाजपला फार घाई झाली आहे. सुशांतसिंह प्रकरणी राज्य सरकार खुनी असल्याचे चित्र भाजपने तयार केले होते. मात्र, आता हे प्रकरण सीबीआयकडे असून त्यात भाजपच्या मोठ्या नेत्याचे नाव पुढे येत आहे. त्यामुळे आता भाजपचे नेते गप्प बसले आहेत, अशी टीकाही त्यांनी केली. 

हेही वाचा - यवतमाळमध्ये पूजा अरुण राठोडचा गर्भपात; डॉक्टर आठ दिवसांपासून गायब ?

राज्याचे हाल होऊ नये यासाठी अध्यक्षपदाची विचारणा - मुनगंटीवार
अध्यक्षपद कधी करणार? हा अधिकार घटनेनं राज्यपालांना दिला आहे. अधिवेशनाची सुरुवात आणि स्थगित हे राज्यपाल करतात. अध्यक्ष पदाच्या निवडीची काहीच हालचाल नाही. त्यामुळे राज्याचे हाल होऊ नये यासाठी त्यांना विचारणा केली, अशी प्रतिक्रिया सुधीर मुनगंटीवार यांनी नाना पटोलेंनी केलेल्या वक्तव्यावर दिली.

शेतकऱ्यांच्या मागण्यांना आमचं नेहमीच समर्थन आहे. मात्र, चुकीचा भ्रम निर्माण करून, जे कायदे राज्यात अस्तित्वात आहेत त्याला केंद्रात विरोध करणे याला आमचा विरोध आहे. काही लोक सत्तेच्या हव्यासापोटी देशात आंदोलन करत असेल तर हे निश्चित चिंताजनक आहे, असे मुनगंटीवार म्हणाले. 

loading image