Nagpur News: नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी जाहीर झालेल्या प्रभाग रचनेवर काँग्रेसने नाराजी व्यक्त केली आहे. भाजप मात्र बहुमत मिळविण्याच्या तयारीत आहे. काँग्रेस नेत्यांकडून सरकारवर प्रभागरचनेबाबत आक्षेप नोंदवले जात असून भाजप उत्साहात निवडणुकीस सामोरे जाणार आहे.
नागपूर : मनपा निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाली. त्यावर माजी नगरसेवकांनी नाराजी अथवा सावध भूमिका घेतली आहे. काँग्रेसने सरकारला लक्ष्य करीत २०१७ च्या निवडणुकीत मतदार संख्या अधिक असताना आता कमी कशी केली, असा सवाल केला.