vijay wadettiwar
नागपूर: चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसचीच सत्ता येणार आहे. त्यासाठीचे आवश्यक संख्याबळ जमवल्याचे काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी आज स्पष्ट केले. काँग्रेसचे नगरसेवक भाजपच्या संपर्कात ही भाजप नेत्यांची वक्तव्ये म्हणजे पतंगबाजी असल्याचा टोला वडेट्टीवार यांनी माध्यमांशी बोलताना लगावला.