गोरेवाडा तलावात सोडले जातेय दूषित पाणी, अर्ध्या नागपूरला पाणीपुरवठा

gorewada
gorewadae sakal

नागपूर : अर्ध्या शहराला पिण्याचे पाणी पुरवणाऱ्या गोरेवाडा तलावात (gorewada lake) चक्क दूषित दुर्गंधीयुक्त पाणी सोडले जात आहे. यामुळे नागपूरकरांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली असून या प्रकारावर नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे. (contaminated water in gorewade lake of nagpur)

gorewada
दोन ‘हायफाय’ सेक्स रॅकेटवर छापा; चार युवतींची सुटका

घनदाट वृक्षाईने घेरलेला गोरेवाडा तलाव नागपूरचे वैभव. पेंच प्रकल्पातून आणलेले पाणी गोरेवाड्यात साठवले जाते. तिथून पुढे हेच पाणी शुद्धीकरणानंतर वस्त्यांपर्यंत पोहोचविले जाते. तलावाच्या वरच्या भागात असलेल्या दाभासह अन्य वस्त्‍यांमधील सांडपाणी थेट या तलावात येत आहे. तलावापूर्वी खोलगट भागात हे पाणी साचते. पावसाळ्यात मात्र हे पाणी वाहून तलावाच्या पाण्यात मिसळत आहे. या भागात मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. ही बाब त्यांच्याच लक्षात आली. यानंतर या किळसवाण्या प्रकाराची माहिती संबंधिताना वारंवार दिली गेली. परंतु, त्याची कुठेही दखल घेतली जात नसल्याचे फिरण्यासाठी येणारे नागरिक सांगतात. वर्षभरच हे दूषित पाणी तलावात मिसळत असते. पण, पावसाळ्यात ही समस्या अधिकच गंभीर ठरते. तलावात मिसळत असलेले पाणी जनावरेही पीत नाही. तेच पाणी नागपूरकरांच्या वाट्याला येत असल्याची भावना अरुण कदम, डॉ. अदनानूल हक, अब्दुल मतीन आदींनी व्यक्त केली.

मुख्यमंत्री कार्यालयाकडून दखल -

आरोग्याच्या दृष्टीने घातक असणाऱ्या या प्रकाराची तक्रार मंगळवारी डॉ. एम. ए. रशीद यांनी मुख्यमंत्री व जिल्हाधिकारी कार्यालयाकडे केली आहे. त्याच दिवशी मुख्यमंत्री कार्यालयाकडून त्यांना मेलद्वारे समस्येची दखल घेण्यात आली असून उपाययोजना व योग्य कारवाई करण्याची ग्वाही देण्यात आली आहे.

अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी -

सांडपाण्यामुळे नाग नदी व अन्य तलावांचे वैभव धोक्यात आले आहे. आता तोच प्रकार या तलावासंदर्भातही सुरू आहे. या प्रकारासाठी प्रशासकीय अनास्था हेच सर्वात प्रमुख कारण आहे. दुर्लक्ष करणाऱ्या बेजबाबदार अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.

समस्याच समस्या -

सकाळी फिरणाऱ्यांसाठी तलावालगतच्या भागात तयार करण्यात आलेल्या ट्रॅकची दुरवस्था झाली आहे. यामुळे फिरण्यासाठी येणाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. सुरक्षा रक्षकांच्या दुर्लक्षामुळे प्रेमी युगुलांचा सर्रास वावर असतो. आरोग्यदायी उपक्रम म्हणून सायकल उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. पण, त्यांचीही दुरवस्था झाली आहे.

लोकांना गोरेवाडा तलावातील दूषित पाणी पाजले जात आहे. या प्रकाराला आळा घालण्यासाठी आवश्यक उपाययोजना तत्काळ करावी.
-डॉ. एम ए रशीद
दूषित पाण्यामुळे गोरेवाडा तलावाचे वैभव लोप पावत आहे. या प्रकाराला वेळीच आळा घालणे आवश्यक आहे. निसर्ग संवर्धनाच्या केवळ बाता मारून उपयोग होणार नाही.
-दीपक तभाने, अध्यक्ष गोरेवाडा जंगल ट्रॅकर्स

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com