esakal | दोन ‘हायफाय’ सेक्स रॅकेटवर छापा; चार युवतींची सुटका
sakal

बोलून बातमी शोधा

दोन ‘हायफाय’ सेक्स रॅकेटवर छापा; चार युवतींची सुटका

दोन ‘हायफाय’ सेक्स रॅकेटवर छापा; चार युवतींची सुटका

sakal_logo
By
अनिल कांबळे

नागपूर : हुडकेश्‍वर आणि वाठोडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या दोन हायफाय सेक्स रॅकेटवर छापा घातला. या छाप्यात दोन महिला दलालांना अटक करण्यात आली तर देहविक्री करणाऱ्या चार युवतींची पोलिसांनी सुटका केली. त्यामध्ये एका १५ वर्षांच्या मुलीचा समावेश आहे. शालिनी राजू पटले (४५, रा. श्रावणनगर, वाठोडा) आणि विद्या धनराज फुलझेले (४२, संजुबा शाळेमागे, हुडकेश्‍वर) अशी महिला दलालांची नावे आहेत. (Nagpur-Crime-News-Prostitution-Two-Woman-Arrested-Release-of-four-young-Girl-nad86)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला दलाल शालिनी पटले ही वाठोड्यातील श्रावणनगरात सेक्स रॅकेट चालवीत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाला मिळाली. सहायक पोलिस निरीक्षक रेखा संपकाळ यांच्या मार्गदर्शनात वाठोड्यात सापळा रचण्यात आला. बनावट ग्राहक शालिनीकडे पाठविण्यात आला. पंटरने शालिनी हिच्याशी सौदा केला. त्यावेळी शालिनीच्या घरात १५ वर्षीय मुलगी आणि दोन २४ वर्षीय युवती होत्या.

पंटरने पैसे दिले आणि तिने रूम उपलब्ध करून दिली. पंटरने दबा धरून बसलेल्या पोलिस पथकाला इशारा केला. पोलिसांनी घरातून तिघींनाही ताब्यात घेतले तर शालिनीला अटक केली. पारडीत राहणाऱ्या दोन्ही तरुणी शालिनीकडे तीन वर्षांपासून देहविक्रीचा व्यवसाय करीत होत्या. शालिनी त्यांना आंबटशौकीन ग्राहक आणि घरातील दोन रूम उपलब्ध करून देत होती. १५ वर्षीय मुलगी दहावीची विद्यार्थिनी आहे.

हेही वाचा: जुळ्या बहिणींनी वयाच्या अकराव्या वर्षी उभा केला व्यवसाय

मैत्रिणीनेही थाटला धंदा

शालिनी पटले हिची मैत्रीण विद्या फुलझेले हिने संजुबा शाळेमागे असलेल्या घरात सेक्स रॅकेट सुरू केले होते. पोलिसांनी तिच्याही घरी पंटर पाठवला. तिने लगेच एका २४ वर्षीय युवतीला घरी बोलावले. पंटरकडून विद्याने सौदा केला आणि पैसे घेतले. दोघांनाही रूम उपलब्ध करून दिली. पंटरने इशारा करताच पीआय रायन्नावार यांच्या पथकाने छापा घातला. युवतीला ताब्यात घेतले तर विद्याला अटक केली. युवती ही पूर्वी ब्यूटीपार्लरमध्ये काम करीत होती. लॉकडाउनमुळे ती घरी जाऊन सर्व्हिस देत होती. विद्याने प्रतिग्राहक हजार रुपये देण्याचे आमिष दाखवत तिला देहव्यापारात ओढले होते.

(Nagpur-Crime-News-Prostitution-Two-Woman-Arrested-Release-of-four-young-Girl-nad86)

loading image
go to top