esakal | डागा रुग्णालयातील कंत्राटी कामगारांवर उपासमारीची वेळ; कामबंद केल्याचा फटका

बोलून बातमी शोधा

Representative Image
डागा रुग्णालयातील कंत्राटी कामगारांवर उपासमारीची वेळ; कामबंद केल्याचा फटका
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर :आम्ही एजन्सीमार्फत लागलेले कामगार डागा रुग्णालयात (Daga Hospital) दहा ते बारा तास मेहनत करतो. चार ते पाच वर्षानंतरही वेतनवाढ (Salary Hike) मिळाली नाही. पोटाला पुरेलं येवढंच मिळत होतं. मात्र आता कंत्राटदाराने रुग्णालयातील सेवा बंद केली. दुसऱ्याला कंत्राट मिळाले. मात्र, आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. ही व्यथा आहे डागा शासकीय स्मृति स्त्री रुग्णालयातील (Government women Hospital) कंत्राटी कामगारांची. (Contract Workers are facing problems cancellation of contracts in Daga hospital Nagpur)

हेही वाचा: ‘अहो, आमच्याकडे जगप्रसिद्ध लोणार आहे’, हे वाक्य फक्त बोलण्यापुरतेच

उपराजधानीतील डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालयात कामगार दिनाच्या पर्वावर अचानक कंत्राटदाराने स्वच्छतेशी संबंधित सेवा देणे बंद केले. त्यामुळे तेथील त्याच्यामार्फत सेवा देणाऱ्या सर्व आउटसोर्स (कंत्राटी कामगार) कामापासून वंचित झाले. डागा रुग्णालयात स्वच्छतेशी संबंधित ५० कंत्राटी कर्मचारी आहेत. चैतन्य सिक्युरिटीज या कंपनीच्या माध्यमातून त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला. निविदा प्रक्रियेप्रमाणे मुदत संपली.

नवीन प्रक्रिया होईस्तोवर त्याला पुन्हा काम सुरू ठेवण्याची सूचना प्रशासनाने केली होती. परंतु कालांतराने या कंपनीकडून काम करण्यास असमर्थता दर्शवली गेली. त्यानंतरही रुग्णालय प्रशासनाच्या विनंतीवरून काही दिवस या कर्मचाऱ्यांनी काम केले. दरम्यान १ मे पासून अचानक कंत्राटदाराने सेवा देणे बंद केले.

हेही वाचा: 'परमबीर सिंग यांची भूमिका संशयास्पद' : माजी गृहमंत्री अनिल देशमुख

त्यानंतर प्रशासनाने तातडीने एका समितीच्या माध्यमातून निविदाची तात्पुरती प्रक्रिया करून न्यू ज्वाला या कंपनीला तात्पुरत्या स्वरूपात कर्मचारी उपलब्ध करण्याचे काम दिले. परंतु त्याकडूनही काही दिवसांचा अवधी मागण्यात आला. दोन दिवस डागा प्रशासनाने काही कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून स्वच्छतेचे काम केले. मात्र नियमानुसारच काम करण्यात येणार असल्याने तुर्तास त्यांच्या हातातील काम गेले आहे.

डागा रुग्णालयाची या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या प्रकरणात प्रशासनाचा थेट संबंध नाही. मानवीय दृष्टिकोनातून जुन्या कर्मचाऱ्यांना सेवेवर घेण्याबाबत तात्पुरते कंत्राट दिलेल्या कंपनीला विनंती केली आहे. संबंधित कंपनी त्यासाठी अनुकूल आहे. कर्मचाऱ्यांनी नवीन कंपनीसोबत संपर्क साधावा.
- डॉ. सीमा पारवेकर, वैद्यकीय अधिक्षक, डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालय, नागपूर.

(Contract Workers are facing problems cancellation of contracts in Daga hospital Nagpur)