‘अहो, आमच्याकडे जगप्रसिद्ध लोणार आहे’, हे वाक्य फक्त बोलण्यापुरतेच

‘अहो, आमच्याकडे जगप्रसिद्ध लोणार आहे’, हे वाक्य फक्त बोलण्यापुरतेच

लोणार : पन्नास लाख सत्तर हजार वर्षांपूर्वी पृथ्वीवर महाकाय उल्का (Meteor) पडली. त्यातून लोणार सरोवराची (Lonar Lake) निर्मिती झाली. बेसाल्ट खडकाळ (Besalt Stone) परिसरातील खाऱ्या पाण्याचे हे जगातील एकमेव सरोवर आहे. जागतिक दर्जाची अनेक मानांकने लोणार सरोवराला प्राप्त आहेत. लोणार तालुक्यातील एखाद्या गावातील लोकांनाही हे आता पाठ झाले आहे. नेते, पुढाऱ्यांनी तर केव्हाच तोंडपाठ केले आहे. परंतु, हे फक्त बोलण्यापुरतेच आहे. या जागतिक वारशाचे फारसे कुणालाच काही घेणे-देणे नाही, असे दिसते. सरोवरात घाण करण्याचे काम लोकांनी केले; तर विकासासाठी मिळालेले कोट्यवधी रुपये सफाचट करण्याचेही काम प्रशासकीय आणि राजकीय पातळीवर (Administration) झाले. आजही होत आहे. (No development regarding tourism at Lonar Lake in Buldhana)

‘अहो, आमच्याकडे जगप्रसिद्ध लोणार आहे’, हे वाक्य फक्त बोलण्यापुरतेच
शववाहिनीच झाली तिरडीचे खांदेकरी; मृतदेह नेण्यास माणसं तयार होत नसल्याने उपाययोजना

सरोवरामुळे नैसर्गिक साधनसंपत्तीने परिसर समृद्ध आहे. लगतच अभयारण्य असल्याने पर्यटकांचा ओढा लोणारकडे असतो. लोणार सरोवराला जगभरातील पर्यटक भेट देतात. सरोवराच्या अभ्यासावर विदेशी संशोधकांसह राज्यातील विविध विद्यार्थ्यांनी डॉक्टरेट मिळविली. लोणारला वैज्ञानिक, ऐतिहासिक, पौराणिकदृष्ट्या अनन्यसाधारण महत्त्व आहे. परंतु, पर्यटकांनी एक-दोन दिवस राहतो म्हटले तर येथे चांगल्या सोयी नाहीत. त्यामुळे केवळ नेत्रसुख घेऊन पर्यटक निघून जातात. घटत्या पर्यटकसंख्येमुळे स्थानिक रोजगारावर मोठा परिणाम झाला. लोणार सरोवराला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढविण्यासाठी सामूहिक पुढाकार घेण्याची गरज आहे. सरकारने पर्यटकांसाठी पॅकेज देत, ट्रॅव्हल्स कंपन्यांना सवलत देण्याची गरज आहे.

मेहकर तालुक्याचा दौरा आटोपून लोणार गाठले. सरोवरामुळे सतत चर्चेत असणाऱ्या या तालुक्याला भेट देण्याची बऱ्याच वर्षांपासूनची इच्छा होती. ‘सकाळ’चे लोणार तालुका बातमीदार श्याम सोनुने यांनी ‘रिसिव्ह’ केले. ते लोणार सरोवराची महती सांगू लागले, सरोवराचे पाणी खारे असल्याने यात जीवजंतू नाही. मात्र, येथील पाण्यात जैविक शेवाळ असल्याचा शोध लागला. जागतिक ‘अ’ दर्जाचे पर्यटन केंद्र असलेले लोणार सरोवर मेहकर तालुक्यात होते. मात्र, तत्कालीन मुख्यमंत्री बॅरि. अंतुले यांनी १ मे १९८१ रोजी ज्या नवीन तालुक्याची निर्मिती केली, त्यात लोणारचा समावेश केला. स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळवून देण्याची ताकद या वैभवात आहे. परंतु, मोठ्या प्रमाणात पैसा मिळूनही येथील विकास रखडला असल्याचे त्यांनी सांगितले. लोणार सरोवराची खरी समस्या जाणून घेण्यासाठी निघालो मग सरोवराच्या दिशेने.

लोणार तालुका विदर्भ-मराठवाड्याच्या सीमेवर आहे. पूर्वेकडे वाशीम जिल्हा तर दक्षिणेला जालना आणि हिंगोली जिल्हे लागून आहेत. येथील लोणार सरोवराला जगाच्या नकाशावर पोहोचविण्याचे काम दिवंगत सुधाकरराव बुगदाने यांनी केले. त्यांनी नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. न्यायालयाच्या निर्देशानुसार आता विकासकामे सुरू झाल्याचे समजते.

नैसर्गिक चमत्काराने निर्माण झालेले लोणार सरोवर पाहण्यासाठी देशविदेशातून पर्यटकांची गर्दी होते. मात्र, नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्यापासून ते शौचालयापर्यंत साध्या-साध्या सुविधा येथे नाहीत. त्यामुळे पर्यटकांचा हिरमोड होतो. लोणारच्या विकासाकरिता शासनाकडून दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा निधी देण्यात येतो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ५ फेब्रुवारी २०२१ रोजी लोणार सरोवर संवर्धन व विकास आराखड्याची बैठक घेऊन १०७ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला; परंतु निधीच्या तुलनेत विकासकामांची गती शून्य असल्याने अपेक्षित विकास झालेला नाही. शासनासह विविध संस्था, नागरिक यांनी पर्यटकवाढीसाठी सामूहिक प्रयत्न करणे गरजेचे आहे.

‘अहो, आमच्याकडे जगप्रसिद्ध लोणार आहे’, हे वाक्य फक्त बोलण्यापुरतेच
कौतुकास्पद! कोरोनाग्रस्तांसाठी तरुण बनला देवदूत; स्वतःच्या गाडीला रुग्णवाहिका बनवून दिवसरात्र सेवा

शंकराची तब्बल १२ मंदिरे, भाविकांची गर्दी

लोणार सरोवर विलोभनीय आहे. सरोवरालगत अखंड वाहणारी धार आहे. या धारेवर स्नान करण्यासाठी नेहमी भाविकांची वर्दळ असते. धारेच्या प्रवाहातून येणारे पाणी काशी तीर्थावरून येत असल्याची आख्यायिका आहे. लोणार सरोवरात कमळजा देवी मंदिर, राम गया मंदिर आहे. राम वनवासात असताना त्यांनी येथे वास्तव्य केल्याची आख्यायिका आहे. परिसरात शंकराची तब्बल १२ मंदिरे आहेत. यातील मोठमोठ्या पिंडी भाविकांचे आकर्षण ठरतात. लोणार शहरात दैत्यसुदन मंदिर असून, कोणार्क सूर्य मंदिराप्रमाणे याची बांधणी आहे. हे मंदिर पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होते.

पर्यटनासाठी पॅकेज, ट्रॅव्हल्स कंपन्यांना हवी सवलत

लोणार सरोवराला अभयारण्याचा दर्जा प्राप्त झाला होता. ३८३ हेक्टर जमिनीवर असलेले अभयारण्य २०१९ पासून वन्यजीव विभागाच्या व्यवस्थापनात गेले आहे. लोणार सरोवर व परिसरात मोर, हारोल शेकाट्या, होला बगळा, सुगरण, कोतवाल, चष्मेवाला ढोकरी या पक्ष्यांचे वास्तव्य आहे. येथे पाणकावळा, रोहित चक्रवाक, रंगीत करकोचा, चमचा, पिवळा धोबी हे स्थलांतरित पक्षी येतात. २०२० मध्ये लोणार सरोवर फ्लेमिंगो पक्ष्याचे आगमन झाल्याने पक्षिप्रेमी आनंदित झाले. साइटचा दर्जा मिळाल्याने शासनाकडून निधी मिळून स्थानिकांना रोजगार उपलब्ध होईल, अशी आशा नागरिक बाळगून आहेत. शासनाने पर्यटकांसाठी पॅकेज देत, ट्रॅव्हल्स कंपन्यांना सवलत देत विविध सामाजिक संघटना, विविध टूर कंपन्यांनी त्यांच्या टूरमध्ये लोणार सरोवराचा समावेश करणे गरजेचे आहे.

‘अहो, आमच्याकडे जगप्रसिद्ध लोणार आहे’, हे वाक्य फक्त बोलण्यापुरतेच
धक्कादायक! तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेलेल्या महिलेवर पडली 'त्याची' नजर आणि घडला थरार

राम गया झरा पुनरुज्जीवित

लोणार सरोवर परिसरात नीलगाय, रानडुक्कर, ससे, तडस यांचे वास्तव्य आहे. सरोवराच्या परिसरात अरायमुनिया गवत मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. त्यातील काही भागांचे वन्यजीव विभागाने उच्चाटन केल्याने इतर वनस्पती मोठ्या प्रमाणात वाढत आहे. वन्यजीव विभाग, मी लोणारकर टीमकडून ‘राम गया झरा’ची मागील वर्षी स्वछता केल्याने राम गया झरा पुनरुज्जीवित झाला. त्यामुळे सरोवर परिसरातील वन्यजीवांसह पशुपक्ष्यांची काही प्रमाणात हा होईना सोय झाली.

एकदाच लोणार महोत्सव, पुढे काहीच नाही

लोणार सरोवराचा विकास व्हावा आणि स्थानिकांना रोजगार उपलब्ध व्हावा, याकरिता शहर आणि परिसरातील नागरिकांनी फेब्रुवारी २००६ मध्ये लोकवर्गणीतून लोकोत्सव केला. सन २००७ मध्ये महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक संचालनालयामार्फत लोणार महोत्सव झाला. सन २०१६ मध्ये जिल्हाधिकारी कार्यालय आणि नगरपालिका प्रशासनामार्फत लोणार महोत्सव झाला. या वेळी परदेशी पर्यटक उपस्थित होते. तहसीलदार सुरेश कव्हळे यांनी केलेल्या नियोजनातून स्थानिक कलाकारांना संधी दिल्याने हा महोत्सव चांगलाच गाजला. शासनाने दरवर्षी लोणार महोत्सव घ्यावा, अशी मागणी या वेळी करण्यात आली; मात्र शासनाकडून अद्याप कोणतीही हालचाल झालेली नाही.

‘अहो, आमच्याकडे जगप्रसिद्ध लोणार आहे’, हे वाक्य फक्त बोलण्यापुरतेच
सायबर गुन्हेगाराच्या घशातून पैसे आणले परत; नागपूर सायबर पोलिसांची कामगिरी
विकासाकरिता निधी कमी पडू देणार नाही जागतिक पर्यटकांचे आकर्षण असलेल्या लोणार सरोवराच्या विकासाकरिता शासनाकडून जास्तीत जास्त निधी आणून जगात लोणार सरोवराची वेगळी ओळख निर्माण करण्याचा माझा प्रयत्न आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार प्रतापराव जाधव यांच्या मार्गदर्शनात लोणार विकासाची कामे सुरू आहेत. शासनाकडून ९३ कोटींचा विकास आराखडा मंजूर केला असून, मुख्यमंत्र्यांनी लोणार विकास आराखड्याच्या आढावा बैठकीत लोणार सरोवरासाठी १०७ कोटींचा निधी मंजूर केला. विकासाकरिता निधी कमी पडू देणार नाही.
-डॉ. संजय रायमुलकर, आमदार, मेहकर-लोणार विधानसभा मतदारसंघ
गुलाबी पाणी आणि ‘रामसर साइट’चा दर्जा लोणार सरोवराला नुकताच ‘युनेस्को’च्या जागतिक दर्जाच्या ‘रामसर साइट’चा दर्जा मिळालेला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात शासनाचा मोठा निधी लोणार सरोवराला मिळेल. पावसाळ्यात लोणार सरोवराचे पाणी गुलाबी झाल्याने जगभरात लोणारबद्दल आकर्षण वाढले. वैज्ञानिक, ऐतिहासिक, पौराणिक महत्त्व असलेल्या या सरोवराला चांगले दिवस येतील. स्थानिकांना जास्तीत जास्त रोजगार उपलब्ध व्हावा याकरिता शासनाने पुढाकार घ्यावा.
-सुशीला बाबूसिंग जाधव, माजी नगराध्यक्ष, नगर परिषद, लोणार
‘अहो, आमच्याकडे जगप्रसिद्ध लोणार आहे’, हे वाक्य फक्त बोलण्यापुरतेच
नारीशक्तीने उभारली शेतकरी उत्पादक कंपनी; ऑनलाइन नोंदणी करताच भाजीपाला घरपोच
लोणार सरोवर वन्यजीव विभागाअंतर्गत आहे. येथे पर्यटकांच्या सोयीसाठी तिकीट खिडकी सुरू केली आहे. पर्यटक पास आणि वाहन पास शासनाच्या नियमानुसार दिल्या जातात. नागरिकांनी लोणार सरोवरात अनधिकृत प्रवेश करू नये. कारण, लोणार सरोवरात बिबट्यांचा वावर आहे. भविष्यात दुर्घटना घडल्यास पासधारकांना शासनाच्या योजनेचा लाभ मिळू शकतो. त्यामुळे नागरिकांनी वन्यजीव विभागाचे नियम पाळावेत.
-एस. आर. पाटील, वनपरिक्षेत्र अधिकारी, वन्यजीव विभाग, लोणार
लोणार सरोवर पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक येतात. लोणार सरोवर परिसरात फिरण्यासाठी वन्यजीव विभागाने पासची सुविधा सुरू केली. लोणार सरोवरात मोर मोठ्या संख्येने आहेत. मुलांना मोराबद्दल प्रचंड आकर्षण असल्याने पर्यटक मोठ्या संख्येने येतात. लोणार सरोवरासोबतच झोपलेल्या मारोतीचे दर्शन घेतात. मात्र, शहरात पार्किंगची सुविधा नसल्याने वाहनधारकांची मोठी तारांबळ उडते. शासनाने पर्यटकांना उत्तम सुविधा उपलब्ध करून दिल्यास पर्यटकांची संख्या नक्कीच वाढेल. यासाठी शासनाने पुढाकार घेणे गरजेचे आहे. लोणार सरोवर आणि पर्यटन संकुलाजवळ विसावा कक्ष उभारावा.
-शैलेश सरदार, गाइड, लोणार सरोवर

(No development regarding tourism at Lonar Lake in Buldhana)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com