Gorewada Zoo Museum : वाघ, बिबट्या अन् अस्वलांसाठी कुलरची सोय, गोरेवाड्यात प्राण्यांचेही ठंडा-ठंडा, कुल-कुल

Gorewada Zoo Museum : उन्हामुळे गोरेवाडा प्राणी संग्रहालय व बचाव केंद्रातील वन्यप्राण्यांची विशेष काळजी घेतली जात आहे.
Gorewada Zoo Museum
Gorewada Zoo Museumesakal

Gorewada Zoo Museum : उन्हामुळे गोरेवाडा प्राणी संग्रहालय व बचाव केंद्रातील वन्यप्राण्यांची विशेष काळजी घेतली जात आहे. त्यांच्या आहारात बदल करण्यात आला आहे. अस्वलांच्या आहारात गाजर, बिट, काकड्यांचे प्रमाण वाढविण्यात आले आहे. गारवा मिळण्यासाठी वाघ, अस्वल, बिबट्यांसाठी ३० कुलरची व्यवस्था करण्यात आली आहे.

दिवसातून तीनदा पाणीही दिले जात आहे. उन्हाची तीव्रता वाढत असल्याने येथे हिरव्या जाळ्यांचे आच्छादने टाकली आहेत. हरणांच्या कळपांना संरक्षण देण्यासाठी सावलीची व्यवस्था केली आहे. पिंजऱ्यातील वाघ, बिबट आणि अस्वलांना दुपारी उन्हाचा त्रास होऊ नये, यादृष्टीने कुलर लावले आहेत. त्यात पाणी टाकण्यासाठी कर्मचारी तैनात आहेत.

नागपूरचा पारा ४२ ते ४४ अंशांवर गेल्याने संग्रहालय प्रशासन खबरदारी घेत आहे. प्राण्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जात आहे. प्राण्यांच्या पिंजऱ्यातील तापमान अधिक कमी होऊ नये आणि अधिक वाढूही नये यासाठी त्यात डिजिटल थर्मामीटरही लावले आहे. त्यानुसार कुलर बंद अथवा चालू केले जातात.

परिसर थंड ठेवण्यासाठी धडपड

गोरेवाडा प्राणिसंग्रहालयातील वन्यप्राण्यासाठी कुलर लावले आहेत. वाघाला पाण्यात बसण्यासाठी टाके तयार केलेले आहे. प्राणी जिथे बसतात त्या ठिकाणी सकाळी आणि संध्याकाळी पाणी टाकून तो परिसर थंड करण्यात केल्या जातो.

रेस्क्यू सेंटरमधील प्राण्यांची संख्या

प्राणी संख्या

वाघ - २८

बिबट- २८

अस्वल - २

माकड - ३

घार - ४

कासव - ४

प्राणिसंग्रहालय

वाघ : २

बिबट - ७

अस्वल - ४

हरिण - ७०

गोरेवाडा बचाव केंद्रातील वन्यप्राण्यांना वाढत्या उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून कुलर लावले आहेत. पिंजऱ्यातील तापमान कायम राहावे यासाठी डिजिटल थर्मामीटर लावले आहेत. त्यानुसार, कुलर बंद अथवा सुरू करण्याची व्यवस्था आहे. तृणभक्षक प्राण्यांच्या शरीरातील पाणी कमी होऊ नये म्हणून रोज काकडी, गाजर, बिट, हिरवा चाऱ्याचा आहार दिला जात आहे.

- एस. एस. भागवत, विभागीय वनाधिकारी, गोरेवाडा प्रकल्प

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com