esakal | विद्यापीठाचे अ‌ॅकेडमिक कॅलेंडर बिघडले, विद्यार्थ्यांचे सत्र सहा महिने पुढे
sakal

बोलून बातमी शोधा

Nagpur-University

विद्यापीठाचे अ‌ॅकेडमिक कॅलेंडर बिघडले, विद्यार्थ्यांचे सत्र सहा महिने पुढे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : कोरोनामुळे दोन वर्षांपासून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे (RTM nagpur university) अ‌ॅकाडमिक कॅलेंडर बिघडले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक सत्र (corona affect student acedemic year) सहा महिने पुढे गेले असून, त्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे. (corona affect student academic years in nagpur university)

हेही वाचा: ८० वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकाने दिली कोरोनाला मात; कधीही पडले नाही घराबाहेर

विद्यापीठाद्वारे हिवाळी आणि उन्हाळी अशा दोन सेमिस्टरच्या परीक्षा घेण्यात येतात. जूनमध्ये विद्यापीठाचे पहिले सेमिस्टर सुरू होत असते. त्याच्या परीक्षा विद्यापीठाद्वारे ऑक्टोबरमध्ये घेण्यात येतात. मात्र, मागल्या वर्षी मार्चमध्ये कोरोनाचा राज्यात संसर्ग पसरल्याने उन्हाळी परीक्षा ऑक्टोबर महिन्यात घेण्यात आल्यात. सध्या प्रथम, तृतीय आणि पाचव्या सेमिस्टरच्या हिवाळी परीक्षा घेण्यात येत आहेत. मात्र, विद्यापीठाने अ‌ॅकाडेमिक कॅलेंडर सुधारण्यासाठी मेमध्येच परीक्षा घेण्याचे ठरविले होते. मात्र, पुन्हा कोरोनाची लाट आल्याने विद्यापीठाने मेच्या परीक्षा २९ जूनपासून घेण्याचे ठरविले. त्यामुळे पुन्हा एकदा परीक्षा लांबल्या आहेत. त्यामुळे नव्या सत्राच्या परीक्षा लांबणार आहेत.

अशी परिस्थिती आहे -

सुधारित वेळापत्रकानुसार बीई, बीटेक, बीसीए, बीफार्म, बीएस्सी, बीए प्रथम सेमिस्टर परीक्षा उद्या, गुरुवारपासून (ता. २७) सुरू होणार आहेत. त्याचबरोबर बीबीए, बीकॉम फर्स्ट सेमिस्टरची परीक्षा १ जूनपासून सुरू होणार आहे. एलएलबी प्रथम सेमिस्टर परीक्षा ५ जूनपासून सुरू होणार आहे. विशेष म्हणजे, ही परीक्षा काही आठवड्यांपूर्वीच पूर्ण केली जाणार होती. परंतु, नागपूर आणि विदर्भात कोरोना संक्रमणामुळे मेच्या सुरुवातीच्या काळात ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली. काही दिवसांपूर्वीच नागपूर विद्यापीठाने सुधारित वेळापत्रक जाहीर केले होते.

असे होईल नुकसान -

अ‌ॅकाडमिक कॅलेंडर बिघडल्यामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यास आणि संपूर्ण नियोजन कोलमडले. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमांनुसार, एका सेमिस्टरमध्ये किमान ९० दिवसांचा अभ्यास असणे आवश्यक आहे. मात्र, वास्तविकता अशी आहे की, विद्यापीठे आणि महाविद्यालयांकडे इतका वेळ नाही. अशा परिस्थितीत अनेक महाविद्यालयांमध्ये अभ्यासक्रम पूर्ण केले जात नसल्याचे दिसून येत आहे. विद्यार्थ्यांना केवळ स्वयंअभ्यासाच्या साहाय्याने पेपर काढावे लागतात. त्याचबरोबर व्यवसाय अभ्यासक्रम जे ९० दिवसांचे अभ्यास पूर्ण करणे अनिवार्य आहे, ते एका दिवसात दोन ते तीन लेक्चर्स घेत अभ्यासक्रम पूर्ण करतात. त्याचा परिणाम शिक्षणाच्या गुणवत्तेवर होतो. त्याचबरोबर सहा महिने अभ्यासक्रम मागे गेल्याने पुढील पदवी मिळण्यास तितकाच कालावधी लागत असल्याने विद्यार्थी नोकरीस पात्र ठरण्यास उशीर होत आहे.