मृत शिक्षकांच्या वारसांना मिळणार ५० लाख, ३० जूनपर्यंत प्रस्ताव निकाली काढण्याचे आदेश

death
deathe sakal
Updated on

नागपूर : कोरोनाच्या (coronavirus) वाढत्या संसर्गातही शिक्षक विविध पातळीवर धडाडीने काम करताना दिसून येत आहे. त्यामुळे शिक्षकांमध्येही मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण झाली आहे. त्यामध्ये एकूण चौदा शिक्षकांना (14 teachers died due to corona) कोरोना काळात काम केल्याने झालेल्या संसर्गाने मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. ‘सकाळ'ने याबाबत वृत्त प्रकाशित केले. त्यातून आता मृत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वारसांना ५० (help to corona decease teacher)लाखाचा निधी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. (corona decease teachers family get 50 lakh)

death
उपराजधानी हादरली! शहरात 4 तासांत तब्बल दोन हत्याकांड; तडीपार गुंडांला संपवलं

गेल्या वर्षीपासून कोरोना काळात शिक्षकांना जिल्ह्याच्या सीमेपासून तर धान्य वाटप केंद्र आणि कोरोनाच्या विलगीकरण केंद्रावर काम करावे लागले. त्यानंतर सप्टेंबरला पुन्हा संसर्ग वाढल्याने शिक्षकांना कामास लावण्यात आले. याशिवाय आता शिक्षकांना चाचणी केंद्र, सर्व्हेक्षणासह लसीकरण आणि कोविड सेंटरवर तैनात करण्यात आले आहे. या दरम्यान कोविड सेवेत असताना मृत झालेल्या चार शिक्षकांच्या प्रस्ताव पाठविण्याचे ठरले. मात्र, त्यांपैकी दोन शिक्षकांचाच प्रस्ताव पाठविण्यात आले. मात्र, आत्तापर्यंत एकूण १४ शिक्षकांना कोरोना कामामुळे संसर्ग होऊन त्यात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. शिक्षण विभागाने त्याबाबत कुठलीच कारवाई केली नाही. याबाबत पाठपुरावा करीत, सकाळने वृत्त प्रकाशित केले. त्यामुळे या मृत शिक्षकांच्या कुटुंबाला या योजनेचा लाभ मिळू शकला नाही. मात्र, त्याबाबत ‘सकाळ'ने वृत्त प्रकाशित केल्यावर महाराष्ट्र शिक्षक परिषदेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे कोरोना काळात कामावर असलेल्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना ५० लक्ष रुपयांचे विमाकवच देण्यात यावे, अशी मागणी केली. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी ३० जूनपर्यंत प्रस्ताव निकाली काढण्याचे आदेश दिले आहे. ३० जूनपर्यंत ५० लाखाचे अनुदान लागू असणार आहे.

death
सहा महिन्यापासून रेशनच्या धान्यासाठी 'त्यांची' वणवण; अधिकारी देतात सतत हुलकावणी

अशी आहे प्रक्रिया

कोरोना ड्यूटीवर असलेल्या शिक्षकांना चौदा दिवसासदरम्याम कोरोनाचे संक्रमण झाल्यावर त्यात त्याचा मृत्यू झाल्यास तो विमा कवच निधीसाठी पात्र ठरतो. यासाठी संबंधित शिक्षण विभागाने तो ज्या पंचायत समितीअंतर्गत आहे, त्यांना प्रस्ताव मागवते. यानंतर उपसंचालक तो प्रस्ताव तपासून शिक्षण संचालकांकडे पाठविण्यात येते. विभागाकडून दोन शिक्षकांशिवाय इतर एकाही शिक्षकाचा प्रस्ताव शिक्षण विभागाने पाठविलेला नाही.

फ्रंटलाईन वर्कर्सचा दर्जा द्यावा

महाराष्ट्र शिक्षक परिषदेतर्फे राज्यातील शिक्षकांना फ्रंटलाईन वर्कर्सचा दर्जा देण्याची मागणी करण्यात आली आहे. याशिवाय कोरोना काळात कामावर असलेल्या शिक्षकांना लसीकरण, मृत शिक्षकांच्या वारसांना अनुकंपा, वैद्यकीय सुविधा, रजा सुविधा लागू कराव्यात. अशी मागणी आमदार नागोराव गाणार, योगेश बन, नरेश कामडे, के.के बाजपेयी, पूजा चौधरी, सुनील पाटील, रंजना कावळे व पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com