esakal | "माझ्यामुळे अन्य कुणालाही कोरोना होऊ नये म्हणून मी आत्महत्या करत आहे"; मन सुन्न करणारी घटना 

बोलून बातमी शोधा

चशीलनगरमधील मेहरे कॉलनीत उघडकीस आली. सुरेश महादेव नखाते (वय ५० रा. प्लॉट क्रमांक १४८, सुयोगनगर) असे मृताचे नाव आहे.

चशीलनगरमधील मेहरे कॉलनीत उघडकीस आली. सुरेश महादेव नखाते (वय ५० रा. प्लॉट क्रमांक १४८, सुयोगनगर) असे मृताचे नाव आहे.

"माझ्यामुळे अन्य कुणालाही कोरोना होऊ नये म्हणून मी आत्महत्या करत आहे"; मन सुन्न करणारी घटना 
sakal_logo
By
अनिल कांबळे

नागपूर ः ‘मला कोरोना झाला. त्यामुळे माझे जिवंत राहणे कठीण आहे. . यात कुणालाही दोषी धरू नये’ अशी चिठ्ठी लिहीत एका व्यक्तीने धावत्या रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज पंचशीलनगरमधील मेहरे कॉलनीत उघडकीस आली. सुरेश महादेव नखाते (वय ५० रा. प्लॉट क्रमांक १४८, सुयोगनगर) असे मृताचे नाव आहे.

बापरे! उपराजधानीतील रामदासपेठेत कोरोनाचे संशयित बॉम्ब? पॅथॉलॉजी सेंटरमध्ये गर्दीच गर्दी!

पोलिसांच्या माहितीनुसार, सुरेश नखाते हे बागकाम करायचे. १० एप्रिलला त्यांना सर्दी व खोकला झाला. त्यांच्या पत्नी वर्षा यांनी त्यांना कोरोना चाचणी करण्यास सांगितले. त्यासाठी ते घरून निघाले. रात्र झाली तरी ते घरी परतले नाही. वर्षा यांनी अजनी पोलिसांत बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. 

सोमवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास मेहरे कॉलनीतील रेल्वेरुळाजवळ एका व्यक्तीचा मृतदेह असल्याची माहिती सोनेगाव पोलिसांना मिळाली. त्यानुसार सोनेगाव पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. मृतकाच्या खिशात पोलिसांना चिठ्ठी आढळली. ‘आजारपणाला कंटाळून आत्महत्या करीत असून आत्महत्येसाठी कोणीही जबाबदार नाही, असा मजकूर त्यात होता. 

नाकातील नळी हलल्याने ती तडफडू लागली आणि नातेवाइकांनी आरडाओरड केली; मात्र, सारच संपल

पोलिसांनी वर्षां यांना माहिती दिली. वर्षा तेथे पोहोचल्या. त्यांनी मृतदेह सुरेश यांचा असल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी मृतदेह मेडिकल हॉस्पिटलकडे रवाना केला. तपासणी केली असता सुरेश हे कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले. सुरेश यांनी विष घेतल्यानंतर रेल्वे ट्रॅकवर पोहचल्याची शक्यता आहे. याप्रकरणी सोनेगाव पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

संपादन - अथर्व महांकाळ