esakal | नाकातील नळी हलल्याने ती तडफडू लागली आणि नातेवाइकांनी आरडाओरड केली; मात्र, सारच संपल

बोलून बातमी शोधा

Young woman dies due to negligence of doctors in Yavatmal

शनिवारी सकाळी नाकातील नळी हलल्याने ती तडफडू लागली. नातेवाइकांनी आरडाओरड केली. रुग्णालयातील स्टाफ येण्यापूर्वीच तरुणीचा मृत्यू झाला. डॉक्‍टरांनी उपचारात केलेल्या हलगर्जीपणामुळेच तरुणीचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाइकांनी केला.

नाकातील नळी हलल्याने ती तडफडू लागली आणि नातेवाइकांनी आरडाओरड केली; मात्र, सारच संपल

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

यवतमाळ : पित्ताशयातील गाठीची शस्त्रक्रिया झाल्यावर आठवडाभराने तरुणीचा खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना सकाळी साडेदहाच्यादरम्यान घडली. डॉक्‍टरांनी उपचारात केलेल्या हलगर्जीपणामुळे तरुणीचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाइकांनी केला असून, येथील अवधूतवाडी पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. भाग्यश्री जाधव (वय २४, रा. हिवळेश्‍वर, ता. माहूर, जि. नांदेड) असे मृत तरुणीचे नाव आहे.

पोटदुखीचा त्रास होत असल्याने भाग्यश्रीला उपचारासाठी डॉ. विजय पोटे यांच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. वैद्यकीय तपासणीनंतर तिच्या पित्ताशयाच्या बाजूला गाठ असल्याचे निदान झाले होते. दोन एप्रिल रोजी भाग्यश्रीची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर तरुणीच्या प्रकृतीत सुधारणाही होत होती.

हेही वाचा - शिक्षणाधिकाऱ्यांचा इशारा; शाळा बंद आढळल्यास होणार कारवाई

मात्र, शनिवारी सकाळी नाकातील नळी हलल्याने ती तडफडू लागली. नातेवाइकांनी आरडाओरड केली. रुग्णालयातील स्टाफ येण्यापूर्वीच तरुणीचा मृत्यू झाला. डॉक्‍टरांनी उपचारात केलेल्या हलगर्जीपणामुळेच तरुणीचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाइकांनी केला. रुग्णालयात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. नातेवाइकांनी अवधूतवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून, पोलिस पुढील तपास करीत आहेत.

कागदपत्रे मागविण्यात आली आहेत
नातेवाइकांची तक्रार प्राप्त होताच डॉ. पोटे यांना पोलिस ठाण्यात बोलविण्यात आले. त्यांना उपचाराची कागदपत्रे मागितली. मात्र, नातेवाइकांनी फाइल हिसकावून नेल्याचे त्यांनी सांगितले. डॉक्‍टरांकडे उपचारासंदर्भात असलेली कागदपत्रे मागविण्यात आली आहेत. चार डॉक्‍टरांच्या पथकाने शवविच्छेदन केले. नातेवाइकांकडे असलेली फाईल, डॉ. पोटे यांच्याकडून आलेली कागदपत्रे व शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर तज्ज्ञांच्या मार्गदर्शनात पुढील कारवाई करण्यात येईल.
- मनोज केदारे,
ठाणेदार, अवधूतवाडी पोलिस ठाणे, यवतमाळ