esakal | कोरोना पॉझीटिव्ह रुग्ण म्हणतो मला बळजबरीने पकडून ठेवले आहे, सोशल मीडियावर केला व्हिडिओ व्हायरल
sakal

बोलून बातमी शोधा

Corona-positive patient made video on social media viral

पल्याला बळजबरीने पकडून मेडिकलमध्ये ठेवले. मला फिके व निकृष्ट जेवण दिले जात आहे, असाही आरोप त्याने व्हिडिओतून केला आहे. रविवारी त्याला खिचडी देण्यात आली. परंतु, तक्रार केल्यानंतर प्रशासनाने त्याला तिखट असलेले खिचडी देण्याची सूचना संबंधित यंत्रणेला करीत त्याचे समुपदेशन केले. 

कोरोना पॉझीटिव्ह रुग्ण म्हणतो मला बळजबरीने पकडून ठेवले आहे, सोशल मीडियावर केला व्हिडिओ व्हायरल

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : तो 32 वर्षांचा... राहणार मध्य नागपूर... व्यवसाय टोप्या व टिकली विकण्याचा... व्यवसायानिमित्त तो दिल्लीला गेला होता... मरकजमधील जत्रेपूर्वीच तो नागपुरात परत आला. तरीही त्याचा कोरोना अहवाल पॉझीटिव्ह आला... यामुळे तो नैराश्‍यात आला आहे. सोशल मीडियाचा आधार घेत त्याने आपल्याला जबरदस्ती रुग्णालयात दाखल केल्याचा आरोप केला. तसेच निकृष्ट जेवण देत असल्याचे त्याने व्हिडिओत म्हटले आहे. 

मध्य नागपुरातील बत्तीस वर्षीय व्यक्तीचा टोप्या व टिकल्या विकण्याचा व्यवसाय आहे. व्यवसायानिमित्त तो दिल्लीत गेला होता. मरकजमधील जत्रेपूर्वीच तो मध्य नागपुरात परतला. परंतु, त्या काळात निजामुद्दीन परिसरातील टॉवरच्या माध्यमातून मोबाईल क्रमांक सर्च केले. यात या व्यक्तीचा मोबाईल नंबर होता. यामुळे त्याला विलगीकरण कक्षात आणले होतो. त्याचा कोरोनाबाधित असल्याचा अहवाल येताच मेडिकलमध्ये शनिवारी त्याला दाखल करण्यात आले. यामुळे तो मरकजमधील असल्याचा दाट संशय आला. 

हेही वाचा - भाजप आमदाराने वाढदिवसाला जमवली गर्दी, सर्व नियम तुडवले पायदळी

मात्र, त्या युवकाने आपल्यावर ठपका ठेवण्यात आला असून, सोशल मीडियावर व्हायरल केलेल्या व्हिडिओत मेडिकलची बदनामी केली आहे. आपल्याला बळजबरीने पकडून मेडिकलमध्ये ठेवले. मला फिके व निकृष्ट जेवण दिले जात आहे, असाही आरोप त्याने व्हिडिओतून केला आहे. रविवारी त्याला खिचडी देण्यात आली. परंतु, तक्रार केल्यानंतर प्रशासनाने त्याला तिखट असलेले खिचडी देण्याची सूचना संबंधित यंत्रणेला करीत त्याचे समुपदेशन केले. 

एका खोलीत आठ जणांचे कुटुंब

बाधित रुग्ण मध्य नागपुरातील वस्तीत राहातो. पत्नी, पाच मुलांसह दोन भाच्यांना मेडिकलला तर रुग्णासोबत दिल्ली प्रवास केलेल्या सात जणांना मेयोत दाखल केले गेले. सहप्रवासी सात जणांचे नमुने निगेटिव्ह आले. कुटुंबातील नमुन्यांचा अहवाल रात्री उशिरा पुढे येणार आहे. पाच मुलांमध्ये चा वर्षांचा, सहा वर्षांचा, सात वर्षांचा 10 वर्षांचा तर 11 वर्षांचा मुलगा व एक मुलगी आहे. दोन भाचे आणि त्या बाधिताची पत्नी असे आठ जणांचे कुटुंब दहा बाय दहाच्या खोलीत राहात असल्याची माहिती पुढे आली आहे. 

loading image
go to top