भाजप आमदाराने वाढदिवसाला जमवली गर्दी, सर्व नियम तुडवले पायदळी

BJP MLA dadarao keche distributes food grains at wardha
BJP MLA dadarao keche distributes food grains at wardha

आर्वी (जि. वर्धा) : लॉकडाऊनच्या काळात काम नसल्याने अनेक कामगारांना आमदार दादाराव केचे यांनी वाढदिवसानिमित्त धान्य व जीवनावश्‍यक वस्तूंचे वितरण केले. या वितरणाच्या वेळी सोशल डिस्टेनसिंगच्या नियमाला हरताळ बसल्याने हे धान्य वितरण त्यांच्या अंगलट येण्याचे संकेत आहेत. घरासमोर गर्दी करून सरकारच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी हरीश धार्मिक यांनी ठाणेदार संपत चव्हाण यांना दिले आहे. 

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सरकारने सुमारे लॉकडाऊन लागू केला आहे. या दरम्यान हातावर पोट असलेल्या गरीब कामगारांवर उपासमारीची वेळ आली. याची जाण ठेवून येथील आमदार दादाराव केचे यांनी वाढदिवसानिमित्त धान्य व जीवनावश्‍यक वस्तूंच्या वितरणाचा निर्णय घेतला. यावेळी गर्दी होऊ नये यासाठी पुरेशी यंत्रणा उभी केली नाही. यामुळे त्यांच्या घरासमोर गरजवंतांची चांगलीच गर्दी झाली. धक्काबुक्कीचे वातावरण निर्माण झाले. अशात काही लोकांना धान्याचे वाटप केले व आमदार दादाराव केचे निघून गेले. 

याची माहिती येथील उपविभागीय अधिकारी हरीश धार्मिक यांना मिळताच त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून आमदार दादाराव केचे यांच्यावर लॉकडाऊनच्या काळात नियमाचे उल्लंघन करून सोशल डिस्टेंसिंगचे उल्लंघन केल्याप्रकरणी विविध कलमान्वये कारवाई करण्याचे आदेश दिले आहे. वृत्त लिहेपर्यंत आमदार दादाराव केचे यांच्यावर कुठलीही कारावाई झालेली नव्हती. 

कारवाई करण्याचे आदेश ठाणेदारांना दिले
शासनाने लॉकडाऊन लागू केले आहे. व्यवहारासाठी त्यासाठी काही नियम दिले. या नियमांचे पालन न करता आमदार दादाराव केचे यांच्या घरी मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याची माहिती मिळाली. याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनीही घेतली असल्याने आमदार केचे यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश ठाणेदारांना दिले आहे. 
- हरीश धार्मिक 
उपविभागीय अधिकारी, आर्वी

कारवाईचे आदेश नाही 
नियमानुसार कारवाई करण्यात येईलया प्रकरणात कारवाईचे आदेश आतापर्यंत तरी मिळालेले नाही. पत्र प्राप्त होताच नियमानुसार कारवाई करण्यात येईल. 
- संपत चव्हाण, ठाणेदार 

अडचणीत आणण्याचा प्रयत्न 
रोजमजुरी करणारे काही कामगार माझ्याकडे आले आणि त्यांनी असलेल्या परिस्थितीची माहिती दिली. अनेकांवर उपासमारीची वेळ आल्याचे त्यांनी सांगितले. माणुसकी जपून यातील 21 लोकांना जीवनावश्‍यक वस्तू देण्याचा निर्णय घेतला. त्यांना रविवारी घरी बोलावले. गर्दी होऊ नये म्हणून तीन फुटाचे अंतर सुद्धा आखून दिले होते. त्याप्रमाणे धान्याचे वितरण करून निघून गेलो. माझ्या माघारी विरोधकांनी डाव टाकला व गावातील नागरिकांचे लोंढेच माझ्या घरी पाठवून अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. 
- दादाराव केचे, आमदार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com