esakal | आता डॉक्टर व औषध विक्रेत्यांच्या मदतीने कोरोना रुग्णांवर नजर.
sakal

बोलून बातमी शोधा

app

कोरोनानियंत्रणासाठी ‘नागपूर हेल्थ सर्विलन्स ॲप’ nagpurhealthsurveillance.apk (dirve google.com) तयार करण्यात आले आहे. हे ॲप नागरिकांच्या सुरक्षेसाठी असल्यामुळे शहर व जिल्ह्यातील सर्व डॉक्टर तसेच औषधी विक्रेते यांनी यावर नोंदणी करणे आवश्यक आहे.

आता डॉक्टर व औषध विक्रेत्यांच्या मदतीने कोरोना रुग्णांवर नजर.

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

..नागपूर : औषधी दुकानदारांकडून विकल्या जात असलेल्या पॅरासिटेमाल, कफ सिरफ या औषधांच्या विक्री संदर्भातील माहिती तसेच डॉक्टरांकडे येणाऱ्या सर्दी व ताप असलेल्या रुग्णांच्या माहितीसाठी नागपूर हेल्थ सर्विलन्स ॲप तयार करण्यात आले आहे.                                                                                                या ॲपच्या माध्यमातून जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्यात येणार असल्याने औषधीविक्रेते व डॉक्टरांनी या उपक्रमास सहकार्य करण्याचे आवाहन विभागीय आयुक्त डॉ.संजीव कुमार यांनी केले आहे.                                                     कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत आहे. नागपूर हे ‘रेड झोन’ मध्ये असल्यामुळे या विषाणूचा प्रादुर्भाव वाढणार नाही यासाठी प्रशासन विविध उपाययोजना प्रभावीपणे राबवित आहे. ज्या परिसरात कोरानाबाधित रुग्ण आढळले आहेत तो भाग प्रतिबंधित करण्यात आला आहे. तसेच प्रत्येक नागरिकाची माहिती घेऊन त्यानुसार आरोग्य विषयक तपासणी करण्यात येत आहे. आणि गरज भासल्यास 14दिवस विलगीकरण केंद्रातही ठेवण्यात येत आहे. त्यामुळे नागपूर शहरात तसेच जिल्ह्यातही कोरोनाच्या प्रसारावर नियंत्रण मिळविणे शक्य झाले आहे.             कोरोनानियंत्रणासाठी ‘नागपूर हेल्थ सर्विलन्स ॲप’ nagpurhealthsurveillance.apk (dirve google.com) तयार करण्यात आले आहे. हे ॲप नागरिकांच्या सुरक्षेसाठी असल्यामुळे शहर व जिल्ह्यातील सर्व डॉक्टर तसेच औषधी विक्रेते यांनी यावर नोंदणी करणे आवश्यक आहे. ॲपवर नोंदणी केल्यानंतर डॉक्टरने आपल्या क्लिनिकमध्ये अथवा हॉस्पीटलमध्ये येणाऱ्या ताप अथवा सर्दी अससेल्या रुग्णांची नोंद करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे औषधीविक्रेत्या दुकानदाराने पॅरासिटेमाल व कफ सिरपसारख्या औषधांची विक्री केली असेल अशा ग्राहकांची नोंद ठेवून या नोंदी या ॲपवर दररोज अपलोड कराव्या. या माहितीच्या आधारे संबंधित झोन अथवा रहिवासी क्षेत्रातील नागरिकांचे सर्व्हेक्षण करणे सुलभ होणार आहे. त्यामुळे डॉक्टर व औषध विक्रेत्यांनी नागपूर हेल्थ सर्विलन्स ॲपवर जावून नोंदणी करावी.    

सविस्तर वाचा - शौकिनांनो सावधान! बनावट तंबाखू खाणे उठू शकते जीवावर                                                                        नागपूर हेल्थ सर्विलन्स ॲपवर नागपुरातील आतापर्यंत 615 औषध दुकानदारांनी नोंदणी केली आहे. तसेच बहुसंख्य डॉक्टर या उपक्रमात सहभागी झाले आहेत. अद्याप  nagpurhealthsurveillance.apk (dirve google.com) या ॲपवर नोंदणी न केलेल्या डॉक्टर व औषध विक्रेत्यांनी तत्काळ नोंदणी करावी,असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी केले आहे.