esakal | कोरोना रुग्ण १७ की २७? दीड वर्षातही प्रशासनात समन्वय नाही
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोना रुग्ण १७ की २७? दीड वर्षातही प्रशासनात समन्वय नाही

कोरोना रुग्ण १७ की २७? दीड वर्षातही प्रशासनात समन्वय नाही

sakal_logo
By
केवल जीवनतारे

नागपूर : कोरोनाची पहिली लाट येऊन गेली आणि दुसरीही ओसरण्याच्या मार्गावर आहे. मात्र, दीड वर्षात रुग्णांच्या आकडेवारीसंदर्भात प्रशासनात समन्वय नसल्याचे वारंवार उघड झाले आहे. मेडिकल रुग्णालयात २७ रुग्ण दाखल असल्याचे जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे तर प्रत्यक्षात केवळ दहाच बाधित भरती आहेत. (coronavirus-corona-patient-covid-patient-in-Nagpur-nad86)

रुग्णांसंदर्भातील खरा आकडा कोणता याबाबत आणखी संभ्रम निर्माण झाला आहे. गुरुवारी जिल्ह्‍यात १७ नव्या रुग्णांची भर पडली आहे. यात शहरातील ९ व ग्रामीणच्या ८ जणांचा समावेश आहे. तर एक जण दगावला. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. यासोबतच जिल्ह्यातील एकूण कोरोनाबळींची संख्या ९ हजार ३९ झाली.

हेही वाचा: ‘...अन्यथा तुझ्या शरीराचे चार तुकडे करून चार राज्यात फेकून देईल’

सध्यस्थितीत शहरात १०४ व ग्रामीणमध्ये ७ असे जिल्ह्यात १११ सक्रिय (अ‍ॅक्टिव्ह) कोरोनाबाधित आहेत. जिल्ह्यात कधीकाळी ७७ हजार रुग्ण गृहविलगीकरणात होते. मात्र, कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर आता जिल्ह्यात अवघे १५ कोरोबाधित रुग्ण गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत.

(coronavirus-corona-patient-covid-patient-in-Nagpur-nad86)

loading image