कोरोना काळात ‘पीएचसी’ ठरले गर्भवतींसाठी वरदान!

Pregnant Women
Pregnant Womensakal

नागपूर : कोरोनाच्या संकटकाळामध्ये जिथे बहुतांशी खासगी रुग्णालये गर्भवतींच्या प्रसूतीसाठी धजावत नव्हती. तिथे शासकीय रुग्णालये हे गर्भवतींसाठी एकप्रकारचे वरदानच ठरले. एप्रिल २०२० ते जुलै २०२१ पर्यंत ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांमध्ये तब्बल ३ हजार ५०३ महिलांच्या नॉर्मल व सिझरने यशस्वी प्रसूती पार पडल्या. यातील काही मातांना कोरोनाची बाधा झाली असताना त्यांना मेयो, मेडिकल येथे रेफर करून प्रसूती पार पाडण्यात आली.

नागपूर शहरात ११ मार्च २०२० रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला. तर ग्रामीण भागात जवळपास एका महिन्याने म्हणजेच १० एप्रिल २०२१ रोजी आढळून आला होता. त्यानंतर हळूहळू रुग्णसंख्येने शहरापाठोपाठ ग्रामीण भागातही पाय पसरण्यास सुरुवात झाली. यात लहानग्यांपासून वृध्दांपर्यंत व प्रसूती मातांनाही कोरोनाची बाधा झाली.

Pregnant Women
औषध घेत नाही म्हणून पत्नीला मारलेली थापड ठरली जीवघेणी

अशा परिस्थितीत बहुतांशी खासगी रुग्णालयांनी बाधित मातांची प्रसूती करण्यास असहमती दर्शविली. अशा परिस्थितीत ग्रामीण भागातील गर्भवती मातांसाठी पीएचसी व उपकेंद्रातील डॉक्टर व परिचारिका मदतीला धावून आले. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात जिल्हा परिषदच्या अखत्यारीत ५३ पीएचसी व ३१६ वर उपकेंद्र कार्यरत असून, जवळपास अठरा लाखांहून नागरिक या भागात वास्तव्यास आहेत.

कोरोनाच्या संकट काळातही या प्रसूत मातांवर योग्य उपचार करून यशस्वी प्रसूती करण्याचे काम पीएचसी व उपकेंद्रातील डॉक्टर, परिचारिकांनी केले. त्यामुळेच एप्रिल २०२१ ते मार्च २०२१ पर्यंत येथे तब्बल २७९९ यशस्वी प्रसूती तर एप्रिल २०२१ ते आजवर ७०४ हून अधिक प्रसूती पार पडल्यात. सोबतच त्यांना घरी सोडण्यात आले आहे. बाधित गर्भवती मातांना प्रसूतीसाठी मेयो, मेडिकल येथे रेफर करून यशस्वीरीत्या प्रसूती पार पडली.

रुग्णालयनिहाय झालेल्या प्रसूती

  • महिना पीएचसी उपकेंद्र

  • एप्रिल २0 ते मार्च २१ २0७५ ७२४

  • एप्रिल २१ ११0 ४९

  • मे १३५ ४३

  • जून १३१ ४८

  • जुलै १३२ ५६

Pregnant Women
१२ हजार जणांचे सदस्यत्व केले रद्द; साई भक्तांचा संताप
१५ महिन्यांच्या कोरोना प्रादुर्भावाच्या काळामध्ये जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत येणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांमध्ये तब्बल ३ हजार ५०३ महिलांच्या यशस्वी प्रसूती पार पडल्यात. केंद्रातील प्रसूती विभागाच्या आणि सर्व कर्मचाऱ्यांच्या मदतीने चांगले काम झाले. कोरोनाच्या काळात शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करून उपचार करण्यात आले.
- डॉ. दीपक सेलोकर, जिल्हा आरोग्य अधिकारी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com