esakal | सरकारला वाटते कोरोना संपला! म्हणूनच की काय लावला बदल्यांचा खेळ?
sakal

बोलून बातमी शोधा

सरकारला वाटते कोरोना संपला! म्हणूनच की काय लावला बदल्यांचा खेळ?

सरकारला वाटते कोरोना संपला! म्हणूनच की काय लावला बदल्यांचा खेळ?

sakal_logo
By
केवल जीवनतारे

नागपूर : मार्चपासून तर मेपर्यंतचा काळ विविध शासकीय कार्यालयातील बदलीचा काळ. मात्र, कोरोनाच्या विषाणूने वर्षभर कर्मचाऱ्यांच्या बदल्या थांबवल्या. अद्यापही कोरोनाचे संकट टळले नाही. तिसरी लाटेचा इशारा देण्यात येत असताना जुलै महिन्यात सार्वजनिक आरोग्य विभागात पावसाळी बदल्यांना ऊत आला आहे. कोरोनाच्या भयाने धास्तावलेल्या कर्मचारी आता या कोरोनाच्या काळात दुसऱ्या शहरात काम कसे करायचे या दहशतीमध्ये असल्याचे चित्र आरोग्य विभागात आहे. (coronavirus-transfers-to-the-health-department-Danger-of-the-third-wave-The-staff-panicked-nad86)

सार्वजनिक आरोग्य विभागात नुकतेच संचालक, सहसंचालक, उपसंचालक, जिल्हा शल्य चिकित्सक संवर्गातील अधिकाऱ्याचे वय वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. या वयवाढीमुळे आरोग्य विभागात असंतोष भडकला आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना बदलीचा डोस देण्यासाठी नवीन फंडा तयार करण्यात आला असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. यामुळे आरोग्य विभागात आता कोणाची बदली होईल आणि कधी कोणाला पदोन्नती मिळेल हे सांगता येत नाही.

हेही वाचा: भाकरी महागली! सर्वसामान्यांनी जगायचे तरी कसं?

आरोग्य विभागात पावसाळी बदल्यांना ऊत आला आहे. आरोग्य विभागात तसा बदलीचा मोसम वर्षभर सुरू असतो. अवघ्या पंधरा दिवसांत रुजू झाल्यानंतर पुन्हा बदली होत असल्याचे प्रकार या विभागात घडतात, हे नवीन नाही. नागपूर उपसंचालक कार्यालयात एकाच पदावर असलेले आरोग्य उपसंचालक आहेत. त्यांना बदलीचे नियम लागू नाहीत. मात्र, इतर कर्मचाऱ्यांना दर तीन वर्षांनी हलवण्यात येत असल्याचे अफलातून प्रकार आरोग्य विभागात आहे.

शासनाला वाटते, ‘कोरोना संपला’

राज्यात सुमारे साडेपाच लाख कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याचा विचार शासन करीत आहे. यावरून राज्य शासनासाठी कोरोना संपला असेच वाटत आहे. कोरोना काळात आरोग्य यंत्रणा ढासळली होती. कसतरी आरोग्य यंत्रणा काहीशी कोरोनाचा सामना करण्यासाठी सज्ज असताना अचानक बदल्यांचे सत्र सुरू झाल्यास साडेपाच लाख कर्मचाऱ्यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नव्याने जावे लागेल. एकीकडे सरकार म्हणते, घराबाहेर पडू नका, तर दुसरीकडे साडेपाच लाख कर्मचाऱ्यांच्या बदल्या करून सरकारच बाहेर काढण्याचा प्रयत्न करीत आहे. ४ जणांचे कुटुंब गृहीत धरले तरी २२ लाख व्यक्तींना दुसऱ्या ठिकाणी हलवावे लागणार आहे. यावरून हा बदल्यांचा खेळ अर्थकारणासाठीतर नाही, अशी जोरदार चर्चा सार्वजनिक आरोग्य विभागात रंगली आहे.

(coronavirus-transfers-to-the-health-department-Danger-of-the-third-wave-The-staff-panicked-nad86)

loading image