esakal | भाकरी महागली! सर्वसामान्यांनी जगायचे तरी कसं?
sakal

बोलून बातमी शोधा

भाकरी महागली! सर्वसामान्यांनी जगायचे तरी कसं?

गव्हापेक्षा भाकरीचे भाव दुप्पट झालेले आहे. गरिबांच्या ताटात भाकरीऐवजी चपाती दिसू लागली आहे.

भाकरी महागली! सर्वसामान्यांनी जगायचे तरी कसं?

sakal_logo
By
राजेश रामपूरकर :सकाळ वृत्तसेवा

नागपूर: ज्वारी (sorghum) हे गरिबांचे धान्य म्हणून तीन दशकापूर्वी समजले जायचे, गहू (Wheat)फक्त सणासुदीलाच त्याच्या ताटात दिसत असे. आता मात्र, परिस्थिती बदलली आहे. ज्वारीचे भाव वाढल्याने आणि भाकरी पचण्यास हलकी असल्याने आता श्रीमंतीचे प्रतीक झाले आहे. गव्हापेक्षा भाकरीचे भाव दुप्पट झालेले आहे. गरिबांच्या ताटात भाकरीऐवजी चपाती दिसू लागली आहे.

हेही वाचा: नागपूर : तरुणाने बाईकसह घेतली तलावात उडी

साधारणता उंची दादरी ज्वारी ५२ रुपये किलो आहे. या तुलनेत गव्हाचे दर २५ रुपयांपर्यंत आहे. त्यामुळे एका किलो ज्वारीत दोन किलो गहू येतो. सध्या महागाईने हिमटोक गाठल्याने अशा परिस्थितीत महागडे धान्य खाणे सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर आहे. केंद्र सरकारने रेशनवर गहू मोठ्या प्रमाणात देण्याचा निर्णय घेतला. एका कुटुंबाला किमान दहा किलो गहू तेही तीन रुपये दराने मिळतो. त्यामुळे ५० रुपये किलो ज्वारी, शाळू घेण्यापेक्षा त्यामध्ये रेशनवरील गहू खाण्याकडे ओढा वाढला आहे असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे गव्हाची विक्रीही कमी झालेली आहे. परिणामी, कोरोनाच्या दहशतीत बाजारातील वर्दळही कमी झालेली आहे.

हेही वाचा: नागपूर : वीज पडून तीन शेतमजुरांचा मृत्यू; दोघे सुदैवाने बचावले

माणसाला हलके अन्न लवकर पचते त्या जेवणाचा त्रास होत नाही. चपातीच्या तुलनेत भाकरी पचायला खूप हलकी आहे. त्याचबरोबर भाकरीतील कणीदारपणामुळे ताकद वाढण्यास मदत होते. कष्टाचे काम करणाऱ्यांना भाकरीच उपयुक्त आहे. ती खाल्ल्याशिवाय पोट भरल्यासारखे वाटत नसल्याचे काहींचे म्हणणे आहे.

हेही वाचा: नागपूर पोलिसांची प्रतिमा होताहे मलीन! विधवेवर बलात्कार

गेल्या तीस वर्षापासून ज्वारीच्या दरात वाढ होऊ लागली आहे. ती वाढ अद्यापही कायम आहे. पेरा कमी झाला आणि मागणी वाढल्याने भाव वाढलेले आहे. पूर्वी ग्रामीण भागात ज्वारीची पेरणी केली जात होती. आता ती कमी झालेली आहे. त्याऐवजी सोयाबीनची पेरणी शेतकऱ्यांनी सुरू केलेली आहे.

- प्रकाश जैस, किराणा व्यापारी.

हेही वाचा: Good News - महालक्ष्मी एक्स्प्रेस 1 जुलै; नागपूर 2 पासून धावणार

अशी वाढली ज्वारीची श्रीमंती (प्रति क्विंटल दर)

--------------------------------------------

वर्ष ज्वारी गहू

---------------------------------------------

१९८० - १४० ते १९० -१७० ते २१०

१९९० - ८५० ते ११५० - १५०० ते १७००

२००० -१४०० ते १७०० १९०० ते २२००

२०१० - २००० ते ३००० २१०० ते २८००

२०२१ - ३५०० ते ५२०० २५०० ते ३२००

loading image