आर्थिक संकटातून दाम्पत्याची आत्महत्या; गळफास घेत संपविले जीवन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Couple suicide

आर्थिक विवंचनेतून एका दाम्पत्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.

आर्थिक संकटातून दाम्पत्याची आत्महत्या; गळफास घेत संपविले जीवन

नागपूर - आर्थिक विवंचनेतून एका दाम्पत्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना रविवारी (ता.२२) रात्री ८ वाजताच्या सुमारास उघडकीस कळमना पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गौरीनगर परिसरात आली. दोघांजवळ सुसाईड नोट आढळून आली. मनोज वासुदेव लोधी (वय ४५), ममता मनोज लोधी (वय ४०) असे या दाम्पत्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मनोज कळमन्यातील गौरीनगर परिसरात भाड्याने वास्तव्यास होते. तो जुन्या गाड्यांच्या खरेदी विक्रीचे काम करायचा. त्यातून त्याचा उदरनिर्वाह चालायचा. मात्र, काही महिन्यांपासून त्याचा व्यवसाय चालत नव्हता. याशिवाय त्याला लकवा मारल्याने तो बेडवर होता. त्यामुळे पैसा येण्याचे सर्वच मार्ग बंद झाले होते. व त्याचा व्यवसाय बुडाला. यामुळे घरी आर्थिक चणचण जाणवू लागली. यातूनच पत्नी ममता हिने स्वतःच्या बहिणीकडून पैसे उधारीने आणले होते.

मात्र, सातत्याने आर्थिक परिस्थिती खालावत जात असल्याने त्यांनी आत्महत्येचा निर्णय घेतला. त्यातून रविवारी सायंकाळच्या सुमारास त्यांनी नायलॉन दोरीच्या साहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. दरम्यान बाजुला किराया राहणाऱ्या अर्चना निकेश बान्ते यांना अंधार पडल्यावरही ममता लोधी यांच्या घरात लाईट सुरू झाले नसल्याने शंका उत्पन्न झाली. त्यांनी दार ठोठावत आवाज दिला.

मात्र, प्रतिसाद न मिळाल्याने खिडकीला लावलेल्या कुलरच्या फटीतून वाकून बघीतले असता, दोघेही गळफास घेत लटकले आढळून आले. यावेळी त्यांनी याची माहिती घरमालकाला दिली. त्यांनी रुमजवळ येत, दार तोडले. याशिवाय याची माहिती कळमना पोलिसांना दिली. त्यातून पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत, मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय वैद्यकीय रुग्णालयात पाठविले. याशिवाय अकस्मात मृत्यूची नोंद केली.

नातेवाईकांकडून बेदखल

मनोज आणि ममता लोधी यांची नातेवाईकांसोबत कधीच जमत नव्हते. त्यामुळे त्यांचे गेल्या अनेक वर्षांपासून बोलणे बंद होते. विशेष म्हणजे त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहेत. त्यापैकी मुलगी एका मुलासोबत पळून गेली. तसेच, मुलगा आजीकडे चंद्रपूरला अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहे. तो गेल्या पाच वर्षांपासून त्यांना भेटायलाही आला नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.

दररोजच्या खाण्याचेही वांदे

मनोज काम करीत असताना, कुठुन ना कुठून घरी खाण्यासाठी काही आणायचा. मात्र, त्याला लकवा मारल्याने तो संपूर्णः बेडवर पडला. त्यामुळे गाड्या खरेदी विक्रीचा व्यवसाय ठप्प झाला. ममता हि त्याच्या सेवेत असल्याने कुठेही कामाला जात नव्हती. त्यामुळे दररोज त्यांच्या जेवणाचीही सोय होत नसल्याची माहिती परिसरातील नागरिकांनी दिली.

Web Title: Couple Commit Suicide Financial Crisis Life Ended By Strangulation

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Nagpurfinancial crisis
go to top