esakal | महापालिकेच्या कोरोना नियंत्रण कक्षात प्रेमीयुगुलाचे चाळे, शिपायामुळे प्रकार उघडकीस
sakal

बोलून बातमी शोधा

nmc

महापालिकेच्या कोरोना नियंत्रण कक्षात प्रेमीयुगुलाचे चाळे, शिपायामुळे प्रकार उघडकीस

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : महापालिकेत (nagpur municipal corporation) कोरोना नियंत्रण कक्ष (corona control room) स्थापन करण्यात आला असून नागरिकांचे फोन घेण्यासाठी एका सामाजिक संस्थेने येथे तरुण, तरुणींची नियुक्ती केली. यातील एक जोडपं सकाळी ६ च्या सुमारास टेरेसवर आक्षेपार्ह स्थितीत आढळून आल्याची खमंग चर्चा महापालिका वर्तुळात रंगली आहे. या तरुण-तरुणीला या सामाजिक संस्थेने येथील जबाबदारीतून मुक्त केल्याचे सूत्राने नमुद केले. (couple offensive activities in corona control room of nagpur municipal corporation)

हेही वाचा: corona positive story : एचआरसीटी स्कोअर १८ तर ऑक्सिजन लेव्हल ८२; मग झाला पुनर्जन्म

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या आदेशानुसार महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासनाने कोरोना रुग्णांना माहिती देण्यासाठी केंद्रीय नियंत्रण कक्ष मनपाच्या प्रशासकीय इमारतीच्या सहाव्या माळयावर सुरू करण्यात आला. तसेच विविध कोविड रुग्णालयांमध्ये रेमडिसिव्हिर, ऑक्सिजन पुरवठयाकरीता देखील वेगळा नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. मनपा मुख्यालयात सुरू करण्यात आलेली ही कंट्रोल रुम २४ तास सुरू असून तीन शिफ्टमध्ये तज्ज्ञांची चमू उपलब्ध आहे. मनुष्यबळाअभावी केंद्रीय नियंत्रण कक्षाच्या संचालनासाठी एका सामाजिक संस्थेचे सहकार्य घेण्यात आले आहे. या संस्थेने तीन शिफ्टमध्ये तरुण-तरुणींची नियुक्ती केली असून ते नागरिकांकडून आलेल्या फोनवर बेडची उपलब्धता कळवित असते. एवढेच खासगी रुग्णालयात दाखल केलेल्या रुग्णाची माहिती एका तासात या केंद्रीय नियंत्रण कक्षाला देणे बंधनकारक आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयाकडून माहिती घेण्याचेही कामही येथे नियुक्त तरुण-तरुणी करित आहेत. मात्र, दोन दिवसांपूर्वी याच नियंत्रण कक्षात नियुक्त प्रेमीयुगुल सकाळी सहाच्या सुमारास इमारतीच्या टेरेसवर आक्षेपार्ह स्थितीत येथील शिपायाला आढळून आले. त्याने ही बाब अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. अधिकाऱ्यांनी ही बाब गंभीरतेने घेत सामाजिक संस्थेलाही कळविले. सामाजिक संस्थेने या प्रेमीयुगुलाला येथील जबाबदारीतून मुक्त केल्याचे सूत्राने नमुद केले. मात्र, या घटनेची महापालिका वर्तुळात खमंग चर्चा रंगली आहे.

रात्रपाळीत तरुणींना बोलावण्याचा निर्णय कुणाचा?

केंद्रीय नियंत्रण कक्ष २४ तास सुरू असल्याने तीन शिफ्टमध्ये काम केले जाते. मात्र, रात्रपाळीत तरुणींना बोलावताना त्यांच्या सुरक्षिततेबाबत विचारच केला गेला नसल्याचे दिसून येत आहे. तरुणींना रात्रपाळीत बोलावण्याची गरजच काय? असा सवाल महापालिकेतील काही अधिकाऱ्यांनीही उपस्थित केला. तरुणींना रात्रपाळीत बोलावण्याचा निर्णय कुणाचा? असा प्रश्न यानिमित्त उपस्थित झाला आहे.