esakal | मनपात साडेचार कोटींचा कोविड घोटाळा; आभा पांडे यांचा आरोप
sakal

बोलून बातमी शोधा

मनपात साडेचार कोटींचा कोविड घोटाळा; आभा पांडे यांचा आरोप

मनपात साडेचार कोटींचा कोविड घोटाळा; आभा पांडे यांचा आरोप

sakal_logo
By
नीलेश डाखोरे

नागपूर : कोविडच्या (coronavirus) काळात उपचार आणि साहित्य खरेदीच्या नावावर महापालिकेच्या (Nagpur Municipal Corporation) अधिकाऱ्यांनी सुमारे साडेचार कोटींचा घोटाळा (Covid scam) केल्याचा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस व नगरसेविका आभा पांडे (Abha Pande) यांनी केला. हा सर्व गैरव्यवहार उघडपणे सुरू असताना आयुक्त झोपले होते काय असा सवालही त्यांनी उपस्थित केला. (covid-scam-of-Rs-4.5-crore-in-NMC;-Abha-Pande's-allegation)

सर्व घोटाळ्याचे अंकेक्षण करण्यात यावे. पंधरा दिवसांच्या आता दोषींवर कारवाई केली नाही तर राज्य शासनाकडे तक्रार केली जाईल तसेच सर्वांना न्यायालयात खेचले जाईल असाही इशारा पांडे यांनी पत्रकार परिषदेत दिला. विशेष म्हणजे कोविड पॉझिटिव्ह आणि सुटीवर असताना आरोग्य अधिकारी चिलकर, सवई व बहिरवार यांनी वेगवेगळ्या नस्तींवर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. कोविड आपत्ती व्यवस्थापनासाठी आलेल्या निधीतून श्वान दंशाच्या लसी खरेदी करण्याचा विक्रम अधिकाऱ्यांनी केला आहे.

हेही वाचा: यवतमाळ जिल्ह्यात वीज पडून दोन ठार; दुसऱ्या दिवशीही मुसळधार

महापालिकेने दोन हजार नग व्हीटीएम कीट खरेदी केल्या. त्यासाठी दोन लाख ९१ हजारांच्या एकाच बिलाचे केंद्र व राज्य शासनाच्या निधीतून वाटप करण्यात आले. त्याशिवाय अनेक सेवाभावी संस्था, सरकारी संस्थांनी महापालिकेला मोठ्याप्रमाणात पीपीई कीट भेट दिल्यात. असे असतानाही के. के. ड्रग्स पुरवठा दाराकडून ५७ लाख ४८ हजार ५७० पीपीई कीट खरेदी करण्यात आल्यात. याचा ९८ हजारांचा परतावा केंद्र व राज्य सरकारच्या निधीतून करण्यात आला.

महापालिकेला ९ कोटी ९७ रुपयांच्या खरेदी-विक्री व्यवहाराची माहिती वारंवार मागण्यात आली. त्यापैकी पाच कोटी २८ लाखांचीच माहिती देण्यात आली. उर्वरित रकमेचा हिशेबच मनपाकडे नाही. त्यामुळे कोट्यवधींचा भ्रष्टाचार मनपाचे अधिकारी व कर्मचारी यांनी केल्याचे स्पष्ट होते, असेही आभा पांडे म्हणाल्या.

हेही वाचा: देवा... मी स्वप्नातही असा विचार केला नव्हता रेऽऽ

८४० रुपयांत पीपीई कीटची खरेदी

खाजगी इस्पितळांना पाचशे रुपये पीपीई कीटचे दर आकारण्याचे निर्देश मनपाने दिले होते. प्रत्यक्ष मनपाने ८४० रुपयांमध्ये एक कीट खरेदी केली आहे. साडेपाच हजार ऑक्सिमीटर प्राप्त झाले असतानाही ५७५ रुपयांचे ऑक्सिमीटर १,४४५, १,७९२ व २,४०० रुपये असे वेगवेगळ्या दरात खरेदी केले आहेत.

(covid-scam-of-Rs-4.5-crore-in-NMC;-Abha-Pande's-allegation)