Nagpur : तीन आमदारांकडून घेतले पैसे? ‘तोतया पीए’ला आज नागपुरात घेऊन येणार

तोतया स्वीय सहायकाने महाराष्ट्रासह गोवा आणि नागालँडमधील आमदारांनाही पैसे मागितल्याचे समोर
crime bjp jp nadda fraud pa case Money from three MLA for seat in cabinet politics nagpur
crime bjp jp nadda fraud pa case Money from three MLA for seat in cabinet politics nagpuresakal

नागपूर : मंत्रिमंडळात नंबर लावून देण्यासाठी पैसे मागणाऱ्या भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या तोतया स्वीय सहायकाला अहमदाबादेतील मोरबी येथून ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांचे पथक त्याला घेऊन आज नागपुरात पोहचणार आहे. आतापर्यंत त्याने तीन आमदारांकडून पैसे लाटल्याची माहिती एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली.

तोतया स्वीय सहायकाने महाराष्ट्रासह गोवा आणि नागालँडमधील आमदारांनाही पैसे मागितल्याचे समोर आले आहे. ‘महाराष्ट्रात लवकरच मंत्रिमंळाचा विस्तार होत असून तुम्हाला नगर विकास मंत्रालय देण्यात येणार आहे. त्यासाठी तुम्हाला एक कोटी ६७ लाख रुपये द्यावे लागतील’, असे सांगून नीरजसिंग राठोड याने मध्य नागपूरचे भाजपचे आमदार विकास कुंभारे यांना गंडा घालण्याचा प्रयत्न केला.

crime bjp jp nadda fraud pa case Money from three MLA for seat in cabinet politics nagpur
Nagpur : नागपूरला मिळणार नवीन शैक्षणिक हब ओळख! सीएम, डीसीएम यांनी घेतला IIT बाबत आढावा

कुंभारे यांना संशय आल्याने त्यांनी याप्रकरणी तहसील पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तत्काळ अहमदाबादेतील मोरबी येथे पथक पाठवून त्याला अटक केली. नीरजसिंग हा टाईल्स विक्रेता असून त्याने एकट्याने हे केले की यामध्ये आणखी कुणाचा सहभाग आहे, याबाबत पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

मोबाईल विक्रेत्यामार्फत घेतले पैसे?

नीरजसिंग राठोड याने आमदार विकास कुंभारे यांना मंत्रिमंडळात स्थान मिळवून देण्यासाठी एका कार्यक्रमासाठी १ कोटी ६७ लाख देण्यास सांगितले होते. या कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत हे प्रमुख अतिथी असल्याचे सांगितले होते. विशेष म्हणजे, गुजरातमध्ये एका मोबाईल दुकानदाराच्या खात्यावर ते पैसे ‘आरटीजीएस’केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

crime bjp jp nadda fraud pa case Money from three MLA for seat in cabinet politics nagpur
Nagpur : बांधकामासाठी अग्निशमन सेवा शुल्क वाढणार; राज्यात सरसकट एकच सेवा शुल्क

फसवणुकीत या आमदारांचा समावेश

पोलिसांनी नीरजला अटक केली. त्याची प्राथमिक चौकशी केली असता अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. नीरज याने कुंभारे यांच्याशिवाय कामठीचे आमदार टेकचंद सावकर , हिंगोलीचे तानाजी मुटकुले, बदनापूरचे नारायण कुचे व नंदूरबारचे आमदार राजेश पाडवी तसेच गोवा येथील प्रवीण आर्लेकर व नागालँडचे बाशा मोवाचँग यांनाही मंत्रीपद मिळवून देण्याचे आमिष दाखविले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com