Nagpur : नागपूरला मिळणार नवीन शैक्षणिक हब ओळख! सीएम, डीसीएम यांनी घेतला IIT बाबत आढावा

IIT
IIT

नागपूर : नागपुरात आयआयटीची भर पडणार आहे. त्यामुळे नागपूरला शैक्षणिक हब, अशीही ओळख मिळणार आहे. मिहान, एमआयडीसीच्या माध्यमातून औद्योगिक ओखळ निर्माण करण्याचा प्रयत्न केला केला. परंतु मिहानमध्ये पाहिजे त्या प्रमाणात उद्योग आले नाही.

अलीकडच्या काळात माहिती तंत्रज्ञानकडे विद्यार्थ्यांचा कल वाढत आहे. त्यामुळे केंद्र सरकारकडून अनेक ठिकाणी आयआयटी सुरू करण्यात येत आहे. नागपूरचाही या दृष्टिकोनातून विकास करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री (सीएम) एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री (डीसीएम) देवेंद्र फडणवीस यांच्याकडून होत आहे.

आयआयएम, ट्रीपल आयटी, नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी सुरू झाली. एम्सही सुरू झाले. आता आयआयटी सुरू करण्यात येणार आहे. नुकतीच सीएम शिंदे, डीसीएम फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्हीसीच्या माध्यमातून याबाबतची माहिती देत आढावा घेतला. जागेची पाहणी करून माहिती सादर करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.

यासाठी जवळपास ३०० एकर जागा हवी आहे. समृद्धी महामार्गा नजीक जागा पाहण्याची सूचना सीएम, डीसीएम यांनी केल्याचे समजते. प्राधान्याने शासकीय जागेची पाहणी करण्यात येणार आहे. शासकीय जागा उपलब्धन नसल्यास खासगी जागा अधिग्रहित करण्याच्या सूचना आहे. त्या अनुषंगाने प्रशासनाकडून जागेची पाहणी करण्यात येत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हिंगणा तालुक्यातील मांडवा जवळीची पाहणी प्रशासनाकडून करण्यात आली.

आज ड्रोनच्या माध्यमातून सर्वेक्षणही करण्यात आले. आणखीही काही जागेची पाहणी करण्यात येणार आहे. या सर्व जागांची पाहणी करून संबंधित माहिती सरकारला देण्यात येईल. जागा अंतिम झाल्यावर आवश्यक कार्यवाही करण्यात येणार असल्याचे समजते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com