esakal | साक्षगंध झाल्यानंतर प्रेयसीचे फोटो व्हायरल; प्रियकराविरूद्ध गुन्हा दाखल

बोलून बातमी शोधा

crime news in nagpur

दिलेल्या तक्रारीवरून नंदनवन पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

साक्षगंध झाल्यानंतर प्रेयसीचे फोटो व्हायरल; प्रियकराविरूद्ध गुन्हा दाखल

sakal_logo
By
सकाऴ वृत्तसेवा

नागपूर : चार वर्षे प्रेमसंबंध ठेवल्यानंतर प्रेयसीने कुटुंबियांच्या विरोधामुळे प्रियकराशी ‘ब्रेक अप’ केले. त्यानंतर नातेवाईक असलेल्या युवकाशी साक्षगंध उरकून टाकले. मात्र, प्रियकराला विरह सहन न झाल्यामुळे प्रेयसीला वारंवार भेटायला बोलावणे सुरू केले. लग्न तोंडावर असताना तिच्या होणाऱ्या पतीला तिचे फोटो पाठवून लग्न मोडण्याची धमकी दिली.

पोलिसांंनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नितीन इंगळे (३२, नंदनवन) याचे वस्तीत राहणाऱ्या २८ वर्षीय रिया (बदललेले नाव) हिच्याशी प्रेमसंबंध होते. दोघांनी प्रेमाच्या आणाभाका घेत लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्यांच्या प्रेमाला कुटुंबियांचा विरोध होता. त्यामुळे रियाने आई-वडीलांच्या संमतीने नातेवाईक असलेल्या युवकाशी लग्न करण्याचे ठरविले. त्यांचा साक्षगंध सोहळाही आटोपला. काही दिवसांवर लग्न असल्यामुळे घरात लग्नाच्या तयारी-खरेदी सुरू झाली. यादरम्यान नितीन इंगळे याने रियाला धमकी देणे सुरू केले. वारंवार भेटायला येण्यासाठी बाध्य केले. लग्न काही दिवसांवर असल्यामुळे तिने भेटायला नकार दिला. त्यामुळे त्याने तिचे चार वर्षांपूर्वी काढलेले फोटो होणाऱ्या पतीला पाठवून लग्न मोडण्याची धमकी दिली. २२ एप्रिलला रात्री आठ वाजता तिचा पाठलाग करून तिला सोबत चलण्यासाठी दबाव टाकत होता. तिने आईवडीलांना माहिती दिली. दिलेल्या तक्रारीवरून नंदनवन पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

शेजारणीवर जडले एकतर्फी प्रेम

लकडगंज परिसरात राहणाऱ्या हरिष माधवराव गौरकर (४०) याचे विवाहित असलेल्या शेजारणीवर एकतर्फी प्रेम जडले. त्यामुळे तो नेहमी तिच्या घरासमोर बसून तिला एकटक पाहत होता. तसेच तिला हातवारे करून आपले प्रेम व्यक्त करीत होता. मात्र, त्याच्या इशाऱ्यांकडे पीडित २६ वर्षीय महिलेने दुर्लक्ष केले. त्यामुळे त्याची हिम्मत वाढली. शुक्रवारी हरिष हा महिलेच्या घरासमोर बसून होता. विवाहितेला इशारे करीत होता. दरम्यान त्या विवाहितेचा पती घरी आला. त्याला हा प्रकार लक्षात आला. त्याने हरिषला हटकले आणि पुन्हा पत्नीला जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न न करण्यास बजावले. चिडलेल्या हरिषनेत त्याला मारहाण केली. दरम्यान ती विवाहित पतीला वाचविण्यासाठी आली असता तिच्याशीही अश्‍लील चाळे केले. या प्रकरणी लकडगंज पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला ताब्यात घेतल्याची माहिती आहे.