Crime news : दगडाने ठेचून ऑटोचालकाचा खून

आरोपीला बारा तासात अटक ः सीताबर्डीतील हनुमानगल्लीत आढळला मृतदेह
murder
murderesakal

नागपूर : सीताबर्डीतील हॉटेल गुजरात येथील हनुमानगल्लीत एका ऑटोचालकाचा दगडाने ठेचून खून केल्याची माहिती शुक्रवारी (ता.२१) सकाळी दहा वाजताच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली. याप्रकरणी पोलिसांनी तपासाची सुत्रे हलवित बारा तासात आरोपीला अटक केली.

राजकुमार यादव (वय ४५, रा. लष्करीबाग, भोसलेवाडी) असे मृतक ऑटोचालकाचे नाव असून साहील आनंद राऊत (वय २० रा. आनंदनगर, सीताबर्डी) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. गुरुवारी रात्रीच्या सुमारास तो तिथे उभा असताना, त्याने तिथून जाणाऱ्या साहिल राऊत याला शिविगाळ केली.

दगडाने ठेचून ऑटोचालकाचा खून

दरम्यान त्याने संतापात येऊन त्याच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून केला. यानंतर त्याने त्याचा मृतदेह ब्लॅंकेटमध्ये झाकून तेथील दुकानासमोर ठेवून फरार झाला.

चहासाठी जाणाऱ्यास आढळला मृतदेह

शुक्रवारी सकाळी हनुमानगल्ली परिसरात असलेल्या हॉटेल द्वारका येथे आलेले गणेश सुरेश तायडे (वय ३२ रा.वाळवणा, वर्धा) सकाळी १० वाजताच्या सुमारास चहा पिण्याकरिता रघुवीर हॉटेलकडे जात असताना त्यांना मदन सायकल स्टोर्ससमोर हिरो सायकल स्टोर्सच्या दुकानाच्या शटरखाली ओट्यावर एक व्यक्ती झोपलेल्या अवस्थेत दिसला. त्याचा अंगावर ब्लॅंकेट पांघरलेले होते. त्यांनी ब्लॅंकेट ओढून बघितले असता,

त्यांना त्यांच्या डोक्यावर हातावर पायावर जखमा आढळल्या. त्याच्या डोक्यावर मोठ्या प्रमाणात जखमा आणि बाजूला रक्त लागलेला आयताकृती ओबडधोबड एक दगड दिसून आला. त्यामुळे त्याच्या डोक्यावर दगडाने वार करून खून केल्याचा अंदाज लावण्यात आला. याबाबत सीताबर्डी पोलिसांना सूचना दिली असता, वरिष्ठ पोलिस निरीक्षक अतुल सबनिस यांच्या नेतृत्त्वात ताफा घटनास्थळी पोहचला आणि तपासास सुरुवात केली.

मोर्शीतून आरोपीला अटक

घटनेची माहिती मिळताच पोलिस पोहोचले. तातडीने तपासही सुरू करण्यात आला. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे रेकॉर्डिंग तपासण्यात आले. त्यात संशयित आरोपी आढलला. सोबतच याभागात अॅक्टिव्ह मोबाइलची ट्रेसिंगही सुरू करण्यात आली. त्यातून आरोपीबाबत सुगावा लागला. आरोपी भीतीपोटी मोर्शीजवळील कोलवीर येथे राहणाऱ्या मावशीकडे पळून गेला होता. मोबाइल ट्रेसिंगवरून आरोपी मोर्शीत असल्याचे समजले. गुन्हे शाखेच्या पथकाने मोर्शी गाठून आरोपीला त्याच्या मावशीच्या घरून ताब्यात घेतले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com