बालिकेवर वायुसेना कर्मचाऱ्याचा अत्याचार; दोन दिवसावर होते लग्न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime news nagpur Air Force personnel rape minor gilr who came for wedding

बालिकेवर वायुसेना कर्मचाऱ्याचा अत्याचार; दोन दिवसावर होते लग्न

नागपूर : दोन दिवसावर लग्न आले असताना एका वायुसेना कर्मचाऱ्याने १५ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला. ही घटना गिट्टीखदान पोलिस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी दुपारी तीन वाजताच्या दरम्यान उघडकीस आली. पीडित मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा नोंदविला आहे. आदित्यधनराज नरेश शाहू (२८) असे आरोपीचे नाव आहे. पीडित मुलगी ११ व्या वर्गाची विद्यार्थिनी आहे. तिचे वडील व्यवसायासाठी मुंबईत राहतात. ती तीन मोठे भाऊ आणि आईसोबत गिट्टीखदान हद्दीत राहते. पीडितेच्या घराशेजारीच आदित्यधनराजचे घर आहे. दोघांच्याही घराची छत जुडलेली आहे.

आदित्यधनराजच्या घरी आई-वडील आणि लहान बहीण आहे. तो वायुसेनेत नोकरीला असून चंडीगढमध्ये त्याची तैनाती आहे. १२ मे रोजी त्याचे लग्न ठरले होते. त्यामुळे तो सुटीवर घरी आला होता.सोमवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास पीडिता सुखलेले कपडे काढण्यासाठी छतावर गेली होती. यावेळी आरोपी आपल्या छतावर होता. पीडितेला पाहून त्याने आपल्या छतावरून पीडितेच्या छतावर उडी घेतली. जबरीने तिला पकडून लैंगिक अत्याचार केला. याबाबत वाच्यता केल्यास मारण्याची धमकी दिली. या प्रकाराने पीडिता चांगलीच घाबरली होती.तिला भेदारलेल्या अवस्थेत पाहून कुटुंबीयांनी विचारपूस केली असता आदित्यधनराजने केलेले कृत्य समोर आले. तत्काळ पोलिसात तक्रार करण्यात आली. पोलिसांनी पोक्सो अॅक्टसह विविध कलमान्वये गुन्हा नोंदवून आदित्यधनराजला अटक केली. मंगळवारी त्याला न्यायालयात हजर करून १२ मे पर्यंत पोलिस कोठडी घेण्यात आली आहे.

Web Title: Crime News Nagpur Air Force Personnel Rape Minor Gilr Who Came For Wedding

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top