
जुन्या वादातून ऑटोचालकाचा खून; बारमध्ये बाचाबाची, पाठलाग करून हत्या
नागपूर : जुन्या वादातून एका ऑटोचालकाचा खून करण्यात करण्यात आला. ही घटना सदर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडल. सागर संजय शाहू (२४) रा. नवी वस्ती, मंगळवारी बाजार असे मृतकाचे नाव आहे. आरोपींमध्ये विल्सन पिल्ले व त्याच्या साथीदारांचा समावेश आहे. सागर आणि त्याचे मित्र बारमध्ये दारू पीत असताना रागाने का पाहिले म्हणून बारमध्ये वाद घातला. नंतर पाठलाग करून विल्सन आणि त्याच्या साथीदारांनी सागरचा चाकूने गळा चिरून खून केला. सलग दुसऱ्या दिवशी शहरात खुनाची दुसरी घटना घडल्याने पुन्हा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
प्राप्त माहितीनुसार, विल्सन विलियम्स पिल्ले (२२) रा. खाटीकपुरा याची सदर-मंगळवारी परिसरात दहशत आहे. त्याची कुख्यात गुंड विक्की बैसवारे याच्याशी मैत्री आहे. विल्सनशी सागर शाहू याच्या टोळीचा जुना वाद होता. त्यामुळे दोघेही एकमेकांना वारंवार धमक्या देत होते. सोमवारी रात्री दहा वाजता सदरमधील प्लाझा बारमध्ये विल्सन आणि त्याच्या टोळीतील पिन्नी ऊर्फ हिमांशू कनोजिया (३०) रा. गवळीपुरा, विक्की बैसवारे, अनिकेत आणि काही अन्य सहकारी दारू पीत बसले होते. त्याच बारमध्ये सागर शाहू आणि त्याचा मित्र नेहाल कन्हैया तांबे (२५) रा. भगवाननगर वस्ती हा आला. त्यांनी दारू ढोसली.
सागरने रागाने पाहिल्याचा आरोप करत विल्सन व त्याच्या सहकाऱ्यांनी बाचाबाचीला सुरवात केली. वाद वाढू नये यासाठी सागर व त्याचा सहकारी बारबाहेर पडले. सागरने त्याच्या मित्राला घरी सोडले व तो परत नई वस्तीमध्ये आला. मागावर असलेल्या विल्सन व त्याच्या सहकाऱ्यांनी सागरला गाठले व रागाने का, पाहिले असे विचारत चाकूने त्याच्या मान व कंबरेवर सपासप वार केले. यामुळे तेथे खळबळ माजली. रक्ताच्या थारोळ्यातील सागरला त्याच्या मित्रांनी इस्पितळात नेले. मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात आरोपी विल्सनला अटक करण्यात आली व विक्की बैसवारेल, हिमांशु उर्फ पिन्नी कनोजिया व आणखी एका फरार सहकाऱ्याचा शोध सुरू आहे.
टोळीयुद्धातून हत्या
विल्सन आणि सागर यांच्यातील टोळी संघर्षात खून झाल्याची चर्चा आहे. सागरच्या कुटुंबात त्याला जुळा भाऊ बादल, बहीण व आई-वडील आहेत. त्याचे वडील सुरक्षारक्षक म्हणून कार्य करतात. विल्सनने साथीदार अनिकेतला नेहालशी फोन लावण्यास सांगितले. नेहालने नवी वस्तीतील भगवान किराणासमोर उभे असल्याचे सांगितले. काही मिनिटातच विल्यम आणि त्याचे साथीदार तेथे पोहचले. त्यांनी सागरला घेरून चाकू-तलवारीने भोसकून ठार केले. सागरचा खून झाल्याची माहिती होताच त्याच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला.
Web Title: Crime News Nagpur Murder Of Motorist Over Old Dispute Fighting In The Bar
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..