esakal | ‘दादा.... मी प्रियकरासोबत पळून जात आहे, प्लीज माझा शोध घेऊ नको’
sakal

बोलून बातमी शोधा

‘दादा.... मी प्रियकरासोबत पळून जात आहे, प्लीज शोध घेऊ नको’

‘दादा.... मी प्रियकरासोबत पळून जात आहे, प्लीज शोध घेऊ नको’

sakal_logo
By
अनिल कांबळे

नागपूर : ‘हॅलो दादा... माझे बंटीवर खूप प्रेम आहे... मी त्याच्यासोबत खूप खुश राहू शकते... त्यामुळे त्याच्यासोबत पळून जात आहे... प्लीज माझा शोध घेऊ नको...’ असा फोन भावाला करून १७ वर्षीय बहिणीने प्रियकरासोबत पलायन केले. मुलीच्या आईच्या तक्रारीवरून आरोपी प्रियकरावर पारडी पोलिसांनी अपहरण करून पळून नेल्याचा गुन्हा नोंदविला आहे. (Crime-News-The-girls-escape-Nagpur-Lovers-News-nad86)

पीडित मुलगी ही पारडी हद्दीत राहते. ती बाराव्या वर्गात आहे. तिचे एका युवकावर प्रेम आहे. दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र, तिचा भाऊ आणि वडिलांचा वस्तीत दबदबा असल्यामुळे तिची घरी सांगण्याची हिम्मत नव्हती. त्यामुळे दोघांनीही कुटुंबीयांच्या विरोधात जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी दोघांनीही गेल्या आठवडाभरापासून प्लॅनिंग केले. पळून गेल्यानंतर कोणत्या शहरात जायचे? कोणत्या ठिकाणी राहायचे? काय कामधंदा करायचा? आणि कुटुंबीयांनी शोधू नये म्हणून काय करायचे? हे सर्व ठरवून घेतले.

हेही वाचा: सत्तांतरानंतर प्रश्न रखडला; पाच एव्हरेस्टवीर नोकरीच्या प्रतीक्षेत

मंगळवारी २० जुलैला दुपारी एक नंतर दोघांनीही पळून जाण्याचे ठरविले. योजनेनुसार मंगळवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास ती प्रॅक्टिकल बुक आणण्याच्या बहाण्याने घरून निघाली. तिची चौकात प्रियकर वाट बघत उभा होता. ती छोटीसी बॅग घेऊन लगबगीने आली. दोघांनीही दुचाकीने पलायन केले. परंतु, घरी न दिसल्यामुळे कुटुंब चिंतेत पडेल, अशी भीती तिला होती. त्यामुळे तिने लगेच प्रियकराच्या मोबाईलवरून भावाला फोन केला.

‘मी प्रियकरासोबत पळून जात आहे... शोध घेऊ नका.’ असे सांगितले. त्यानंतर फोन कट केला आणि दोघांनीही शहराबाहेर दुचाकी पळवली. दुसरीकडे बराच वेळ होऊनही मुलगी न परतल्याने चिंतित वडिलांनी तिचा शोध सुरू केला, मात्र ती मिळाली नाही. दरम्यान भावाने तत्काळ कुटुंबीयांना याबाबत सांगितले आणि पोलिसात धाव घेतली. पोलिसांनी अज्ञात आरोपीवर अपहरणाचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

(Crime-News-The-girls-escape-Nagpur-Lovers-News-nad86)

loading image