

Nagpur politics
Sakal
नागपूर: मनपा निवडणुकीचा धुरळा सध्या शिगेला पोहोचला आहे. उमेदवारी, एबी फॉर्म आणि नाराजीनाट्याचा अभूतपूर्व राडा पाहिल्यानंतर अखेर मनपासाठी सर्व उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत. अर्जांसोबत सादर करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रांमधून उमेदवारांची संपत्तीही आता समोर आली असून, भाजपचे माजी नगरसेवक व माजी स्थायी समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा हे मनपा निवडणुकीतील सर्वाधिक श्रीमंत उमेदवार ठरले आहेत.