

Police probe into crypto and hawala transactions in Nagpur reveals major money trail to Dubai.
sakal
नागपूर: शहर सायबर पोलिसांनी क्रिकेट बेटिंगच्या नावाखाली लाखोंची फसवणूक करणाऱ्या आंतरराज्यीय रॅकेटचा भांडाफोड केला. किराणा व्यापाऱ्याच्या तक्रारीवरून ५०० रुपयांच्या फसवणुकीच्या तक्रारीनंतर पुण्यात टाकलेल्या छाप्यात सापडलेल्या एकांशने क्रिप्टो करन्सी आणि हवालाच्या माध्यमातून जवळपास २५० कोटींची माया जमविल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मात्र, सायबर पोलिसांकडून त्याला केवळ सूचनापत्र देऊन सोडल्याची माहिती समोर आली आहे.