एमआरआयपाठोपाठ सीटीस्कॅन बंद; कोविडसहित म्युकरमायकोसिसच्या रुग्णांची गर्दी

एमआरआयपाठोपाठ सीटीस्कॅन बंद; कोविडसहित म्युकरमायकोसिसच्या रुग्णांची गर्दी
Updated on

नागपूर : मेडिकलमध्ये (medical hospital) दीड वर्षांपासून एमआरआय बंद (MRI off) असल्याने सीटी स्कॅनवर म्युकरमायकोसिसच्या (Mucormycosis) आजाराचे सूक्ष्म निरीक्षण करण्यात येत होते. मात्र, मेडिकलमधील सीटी स्कॅनदेखील बंद पडले. यामुळे कोरोनाच्या रुग्णांसाठी वापरण्यात येणारी ट्रॉमा केअर युनिटमधील सीटी स्कॅनवर म्युकरमायकोसिसच्या रुग्णांचे सीटी स्कॅन केले जात असल्याची माहिती पुढे आली आहे. विशेष असे की, कोरोना आणि म्युकरमायकोसिस अशा दोन्ही रुग्णांसाठी वेळ निश्चित केल्याने रुग्णांना बरीच प्रतीक्षा करावी लागत असल्याची माहिती पुढे आली आहे. (CT-scan-discontinued-following-MRI-in-medical)

मेडिकलमध्ये कोट्यवधींची यंत्रसामग्री आहे. मात्र, योग्य नियोजनाअभावी अनेकदा यंत्र बंद पडतात. यामुळे ऐन संकटकाळात बुरशीच्या निदानासाठी एमआरआय यंत्राअभावी सीटीस्कॅनचा आधार घ्यावा लागत होता. दुधाची तहान ताकावर भागवण्याचा हा प्रकार सुरू असतानाच मेडिकलमधील सीटीस्कॅन चार दिवसांपासून बंद पडली आहे.

मेडिकलमध्ये बुरशीच्या आजाराचे १२२ रुग्ण आहेत. त्यांना एमआरआयऐवजी सीटीस्कॅन करण्यात येत आहे. मात्र, आता मेडिकलमधील सीटीस्कॅन बंद पडले. यासंदर्भात तक्रार करण्यासाठी ट्रॉमा केअर युनिटमधील संबंधित डॉक्टरांना मोबाईलवर फोन केल्यास रॉंग नंबर सांगत फोन कापण्यात येत असल्याची तक्रार रुग्णाच्या नातेवाइकांनी केली आहे.

एमआरआयपाठोपाठ सीटीस्कॅन बंद; कोविडसहित म्युकरमायकोसिसच्या रुग्णांची गर्दी
अमरावतीचा समावेश फेज ३ मध्ये; सोमवारपासून जिल्हा ‘अनलॉक’

दोन दिवसांची प्रतीक्षा

मेडिकलमध्ये सीटीस्कॅसाठी रुग्णांची गर्दी असते. त्यात कोरोना तसेच बुरशीच्या आजाराची गर्दी असल्याने येथे सीटीस्कॅनसाठी आलेल्या रुग्णांना दोन दिवसांची प्रतीक्षा करावी लागत असल्याची तक्रार रुग्णाने केली. वेदना सहन करत सीटीस्कॅन काढण्यासाठी आलेले अनेक रुग्ण येथे प्रतीक्षेत असतात. त्यातच विद्युत प्रवाह खंडित झाल्यानंतर जनरेटर आहे. मात्र, जनरेटरचा उपयोग न करता सीटीस्कॅन यंत्र बंद ठेवण्यात येत असल्याची तक्रार करण्यात आली आहे.

(CT-scan-discontinued-following-MRI-in-medical)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com