Cyber Crime : सायबर चोरट्यांचा लाखोंवर डल्ला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Cyber Crime

Cyber Crime : सायबर चोरट्यांचा लाखोंवर डल्ला

नागपूर : सायबर चोरट्यांकडून सेवानिवृत्त विक्रीकर सहायक आयुक्तासह तिघांची फसवणूक करण्याची घटना तीन वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांतर्गत उघडकीस आल्या आहेत. याप्रकरणी पोलिसांनी सायबर चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

सोनेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत उत्पादनाची विक्री करणाऱ्याच्या व्यवसायात गुंतवणूक करण्याच्या नावावर युवतीसह तिघांची सायबर चोरट्याने फसवणूक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार १८ ऑगस्टला चेतना कैलाश बोरूल (वय १९) या बी.कॉम द्वितीय वर्षाच्या विद्यार्थिनीला ६३९३१७५१०१९९, ६३९३१७२४६२६१, ६३९२९१८०५४७३ या क्रमांकावरुन यांनी मॅसेज आला. त्यात त्यांनी दिलेल्या लिंक वर प्रॉडक्ट सेल करण्याकरिता पैसे गुंतवणूक करण्याची बतावणी केली.

यावेळी चेतना आणि तिच्या दोन मैत्रिणींनी प्रत्येकी ८० ते ९० हजार या प्रमाणे २ लाख ६८ हजार ६१८ रुपये गुंतविले. मात्र, परतावा न मिळाल्याने त्यांनी याबाबत सोनेगाव पोलिसांनी तक्रार दिली. त्यावरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

वीजबिलाच्या नावावर फसवले

सेवानिवृत्त सहायक विक्रीकर आयुक्त असलेले विलास सदाशिवराव सुटे (वय ६६ रा. सदासुमन परांजपे शाळा) यांनाही १२ ऑक्टोबरला चुना लावला. विलास सुटे यांना सायबर चोरट्याचा फोन आला. यावेळी त्यांनी विद्युत बील भरले नसल्याने रात्री साडेनऊ वाजता विद्युत पुरवठा खंडित करण्यात येत असल्याची बतावणी केली. यावेळी चोरट्याने लिंक पाठवून त्यातून पैसे भरण्यास सांगितले. यावेळी त्यांच्या दोन खात्यातून २४ हजार ८८३ रुपये वळते केले.

लिंकवर क्लिक करताच सुमारे एक लाख लंपास

महेश देविदास चापळकर (वय ३७) यांच्या पत्नीला मोबाईलवर मॅसेज आला. त्यात एच.डी.एफ.सी बॅकेचे क्रेडीट कॉडचे रेटिंग पॉईन्ट एक्सापायर होत असल्याचे सांगण्यात आले. तो मॅसेज पत्नीने महेश यांना फॉरवर्ड केला आणि लिंकवर क्लिक केले. क्लिक केल्यामुळे त्यांच्या क्रेडिट कार्डमधून ९९ हजार ८८३ रुपये वळते करण्यात आले. याप्रकरणी अंबाझरी पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा नोंदविला आहे.