तरुणांनो, मॅट्रीमोनियल वेबसाईटपासून रहा सावध!

बनावट बाप, मुलीशी फोनवर संभाषण; आर्थिक फसवणूक
cyber crime update Young people beware of matrimonial websites fake profile nagpur
cyber crime update Young people beware of matrimonial websites fake profile nagpur sakal

नागपूर : लग्नास इच्छुक असणाऱ्या मुला-मुलींची माहिती चोरून त्यांच्याशी संपर्क करणे. दोन्ही कुटुंबाची भेट घालवून देण्यासाठी व संपर्क करून देण्यासाठी पैशांची मागणी करणे. मात्र, एकदा का पैसे मिळाले की, त्यांच्याशी कोणताही संपर्क होत नाही. आश्चर्याची बाब म्हणजे, विश्वास बसावा म्हणून बनावट बाप आणि बनावट मुला-मुलींशी फोनवर बोलणे करून देतात. मॅट्रीमोनियल वेबसाईटच्या नावावर सध्या हा गोरख धंदा जोमात सुरू आहे.

नागपूरच्या एका तरुणाला मुंबई येथे असलेल्या ‘मेट्रीमोनी रिश्ते’ नावाच्या लग्न जुळवून देणाऱ्या संस्थेकडून फोन येतो. ही वेबसाइट मुंबईची आहे की नाही. खरी आहे की खोटी याची अजिबात शाश्वती नाही. या नावाने फोन करणारी महिला पल्लवी पाटील असे आपले नाव सांगते. तुमची प्रोफाइल मुलीला व तिच्या वडिलांना खूप आवडली. ‘तुम्ही इच्छुक आहात का? असा प्रश्न विचारते. पलीकडून तरुणाने हो, म्हटल्यास त्याच्या ‘व्हॉट्स अप’वर विदर्भात नोकरी करणाऱ्या सुंदर मुलीचे फोटो पाठविते. समोरचे व्यक्ती तुमच्याशी इच्छुक आहे. त्यांनी तुमचा मोबाईल क्रमांक मागण्याकरिता आम्हाला साडे सहा हजार रुपये ऑनलाइन ट्रान्स्फर केले.

तुम्हाला पण त्यांचा नंबर पाहिजे असेल तर साडे सहा हजार रुपये भरावे लागतील. विश्वास नसेल वाटत तर मुलीच्या वडिलांशी ‘कॉन्फरन्स कॉल’वर बोला. वडीलानंतर ती मुलीशी सुद्धा कॉन्फरन्स कॉलवर बोलून देते. प्रोफाइल जुळत असल्याचे सांगून वारंवार ती पैसे भरण्यासाठी फोन करते. मुलगा जाळ्यात अडकला आणि त्यांनी दिलेल्या खात्यावर पैसे ट्रान्स्फर केले की नंतर त्यांच्याशी संपर्क सुद्धा होत नाही. ज्या मुलीच्या वडिलांशी व मुलीशी बोलणे झाले, नंतर माहिती पडते की दोन्ही बनावट असून ती त्यांचीच माणसे आहेत. जवळपास ४ ते ५ लोकांची ही टीम मुलाला पैसे भरण्यासाठी वेगवेगळ्या क्रमांकावरून फोन करते. सध्या ‘मेट्रीमोनी’ वेबसाईटच्या नावावर मुला-मुलींना फसविण्याचा प्रकार जोमात सुरू आहे.

कॉल सेंटरद्वारे मोठ्या रॅकेटची शक्यता

ज्या खऱ्या मॅट्रीमोनियल वेबसाइट आहे. त्यावरून मुला-मुलींची प्रोफाइल चोरल्या जात आहे. त्यांचे मोबाईल नंबर मिळवून संपर्क केला जातो. ही ४ ते ५ लोकांची टीम एकाच मुलाला व मुलीला वारंवार फोन करून त्यांना बोलण्यातून आपल्या जाळ्यात अडकवते. एकदा पैसे मिळाले की, नंतर पैसे भरणाऱ्यांचे फोन सुद्धा उचलल्या जात नाही. हा सगळा प्रकार मोठ्या शहरातून कॉल सेंटरच्या माध्यमातून चालविल्या जात असून या मागे मोठे रॅकेट असण्याची शक्यता आहे.

मॅट्रीमोनियल वेबसाइटच्या माध्यमातून फसवणूक झाल्याच्या तक्रारी आहेत. अशा वेबसाइटची आधी खात्री करावी. आपली संपूर्ण माहिती किंवा पत्ता कोणत्याही अशा वेबसाइटवर टाकू नये. आमिषाला बळी न पडता, ऑनलाइन पैसे भरताना खात्री करावी. यात पुन्हा फसवणूक होण्याची जास्त शक्यता आहे.

- सुकेशनी लोखंडे, सहायक पोलिस निरीक्षक, सायबर पोलिस

- अखिलेश गणवीर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com