
नागपूर : शहरात सायबर चोरट्यांकडून ऑनलाइन फसवणूक करून ती रक्कम विविध खात्यामध्ये वळविली जाते. यासाठी शहरातील विविध बॅंक खात्यांचा वापर केला जातो. यासाठी बेरोजगार युवकांना हेरून त्यांच्या खात्याच्या माध्यमातून लाखोंचा व्यवहार होत असल्याची बाब समोर आली आहे.