तरुणींचं वेड पडलं महाग, विद्यार्थ्याला १ लाखाचा गंडा

fraud crime
fraud crimesakal media

नागपूर : आपल्या शहरात मैत्री करायची असेल किंवा तिला डेटवर न्यायचे असेल तर फोन करा... असा मेसेज येताच दोन मित्रांनी लगबगीने फोन केला. दोन तरुणींनी त्यांना दोन हजार रुपये मेंबरशिप फी भरण्यास सांगितले. त्यानंतर त्यांच्याशी वारंवार संपर्क करून जवळपास एक लाख रुपयांना (fraud with student) गंडा घातला आहे. याप्रकरणी पाचपावली पोलिसांनी (pachpawli police nagpur) अर्पिता व सोनिया नावाच्या तरूणीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (cyber fraud with 21 years old student in nagpur)

fraud crime
CET नंतरच अकरावीची प्रवेश प्रक्रिया, शिक्षण विभागाचे शाळांना पत्र

पोलिसांच्या माहितीनुसार, आकाश पखडे (वय २१, रा. यशोदीप कॉलनी) याला १६ सप्टेंबर २०२० ला मोबाईलवर एक मॅसेज आला. आपल्या शहरातील सुंदर तरूणी-महिलांशी मैत्री करायची असल्यास आमच्याशी संपर्क करण्यास सांगितले. आकाशने आपला मित्र दुबे याला सांगितले. त्यांनी त्या मेसेजवर प्रतिसाद दिला असता सोनिया नावाच्या तरूणीने त्याला भ्रमणध्वनी करून मैत्री करण्यासाठी प्रथम आमच्या ग्रूपची मेंबरशिप घ्यावी लागेल, असे आमिष दाखवले. मेंबर झाल्यानंतर तुम्हाला आवडेल त्या तरूणींसोबत डेटींगला जाण्याचे स्वप्न दाखवले. मेंबरशिप शुल्क २ हजार रुपये होते. ते आकाशने गुगल पेद्वारा ऑनलाईन भरले. त्यानंतर दुबेच्या गुगल पे वरून सोनियाने वारंवार त्याच्याकडून पैसे उकळले. आकाशनेही महिलांशी मैत्री करण्याच्या उद्देशने पैसे भरत गेला. जवळपास लाख रुपये भरल्यानंतरही तरूणी भेटायला येत नसल्यामुळे आकाश निराश झाला होता. त्यामुळे त्याने पैसे भरणे बंद केले. त्याला पुन्हा सोनिया आणि अर्पिताचे फोन येणे सुरू झाले. परंतु, त्याला डेटींग आणि एकांतात भेटण्याच्या नावावर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्याने पाचपावली पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com