esakal | CET नंतरच अकरावीची प्रवेश प्रक्रिया, शिक्षण विभागाचे शाळांना पत्र
sakal

बोलून बातमी शोधा

admission

CET नंतरच अकरावीची प्रवेश प्रक्रिया, शिक्षण विभागाचे शाळांना पत्र

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : अकरावी प्रवेशासाठी (eleventh admission) वैकल्पिक सामायिक प्रवेश परीक्षा (CET for 11th admission) घेण्यात येणार आहे. त्याद्वारे प्रवेशाला प्राधान्य देण्यात येणार आहे. मात्र, जे विद्यार्थी सीईटी देणार नाहीत त्यांना थेट कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेता येणार आहे. असे असतानाही शालेय शिक्षण विभागाने सर्व कनिष्ठ महाविद्यालयांना पत्र पाठवून अकरावीची प्रवेश प्रक्रिया तत्काळ थांबवून सीईटीचा निकाल लागल्यावरच प्रवेश देण्यात यावा, अशा सूचना केल्या आहेत. (education department letter to school for eleventh admission process)

हेही वाचा: 'ऑक्सिजनअभावी मृत्यू झाला नाहीतर PM फंडमधून प्लांट का सुरू केले?'

शहर आणि ग्रामीण भागात जे विद्यार्थी सीईटीसाठी इच्छुक नाहीत, ते थेट ग्रामीण भागातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेत असल्याची बाब समोर येत आहे. विशेष म्हणजे शहरासाठी केंद्रीय प्रवेश समितीद्वारे अकरावीचे प्रवेश दिले जातात. मात्र, ग्रामीण भागात शाळेत मेरीटवर किंवा 'प्रथम या प्रवेश घ्या' तत्त्वावर प्रवेश दिले जातात. ग्रामीण भागातील बरेचसे विद्यार्थी सीईटी न देता प्रवेश घेण्यास इच्छुक होते. अनेक विद्यार्थी व पालकांनी कनिष्ठ महाविद्यालयात विचारणा करून प्रवेश निश्चिती व्हावी यासाठी प्रयत्न चालविले होते. परंतु, शिक्षण विभागाने पत्र काढून अकरावी प्रवेश प्रक्रिया थांबवावी व सीईटी नंतरच ती सुरू करावी असे निर्देश दिले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील शाळांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.

केंद्रीय प्रवेश समितीद्वारेच प्रवेश -

नागपूर शहरातील कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश केंद्रीय प्रवेश समितीच्या माध्यमातून दिले जातात. समिती लवकरच ११ वीच्या प्रवेशाचे काम सुरू करणार असल्याची माहिती मिळाली आहे. विद्यार्थ्यांकडून प्रवेशासाठी अर्जाच्या पार्ट -१ चे काम सुरू केली जाणार आहे. सीईटी झाल्यानंतर पार्ट-२ भरून प्रवेश निश्चितीसाठी अर्ज भरले जातील. १ ऑगस्ट नंतर यासाठीच्या सूचना दिल्या जातील.

सीईटी सर्व्हरमध्ये ‘एरर’ कायम -

अकरावीच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षेची नोंदणी मंगळवारपासून सुरू झाली आहे. मात्र, पहिल्याच दिवशी नोंदणी करताना तांत्रिक अडचणींचा सामना विद्यार्थ्यांना करावा लागल्याने विद्यार्थी अर्ज भरू शकले नाहीत. सर्व्हरमधील तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी संकेतस्थळ तात्पुरते बंद करण्यात आल्याचा संदेश मंगळवारीच दिसत होता. बुधवारी देखील हाच संदेश संकेत स्थळावर दिसत असल्याने विद्यार्थी सीईटीसाठी अर्ज करू शकले नाहीत.

loading image