esakal | 'शक्ती‘ प्रमाणेच सायबर कायदाही अद्यावत होणार; गृहमंत्री अनिल देशमुख यांचं प्रतिपादन 
sakal

बोलून बातमी शोधा

cyber law will make stronger like shakti law said anil deshmukh

शक्ती काद्याचाच निवाडा अवघ्या ४५ दिवसात होणार आहे. बलात्काऱ्यांना थेट मृत्युदंडाच्या शिक्षेची यात तरदूत करण्यात आली आहे. बुधवारीच या कायद्याचा प्रारुपास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.

'शक्ती‘ प्रमाणेच सायबर कायदाही अद्यावत होणार; गृहमंत्री अनिल देशमुख यांचं प्रतिपादन 

sakal_logo
By
राजेश चरपे

नागपूर :  महिला आणि बालकांवरील अत्याचार रोखण्यासाठी ‘शक्ती़' कायद्याप्रमाणेच वाढत चाललेली सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी हासुद्धा कायदा अद्यावत आणि तेवढाच कडक करण्यात येणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. यावेळी त्यांनी पदवीधर आणि शिक्षक मतदार संघातील विजयाने महाआघाडी अधिक मजबूत झाल्याचे सांगितले.

शक्ती काद्याचाच निवाडा अवघ्या ४५ दिवसात होणार आहे. बलात्काऱ्यांना थेट मृत्युदंडाच्या शिक्षेची यात तरदूत करण्यात आली आहे. बुधवारीच या कायद्याचा प्रारुपास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. आंध्रच्या दिशा कायद्याच्या धर्तीवर तो करण्यात आला आहे. महिलांवरील अन्याय, अत्याच्याराप्रमाणेच सायबर गुन्हेगारी वाढत चालली आहे. त्यामुळे या कायद्यालासुद्धा अद्यावर करण्याची गरज आहे. 

अधिक माहितीसाठी - राणे दाम्पत्य आत्महत्या प्रकरणाचे गूढ उकलले : कुत्र्याचे इंजेक्शन देऊन पत्नीने केला पती, मुलांचा खून

महिलेची बदनामी करणारे फोटो आणि पोस्ट टाकणाऱ्या गुन्हेगारांना शक्ती कायद्यात दोन वर्षांच्या शिक्षेची तरदूत करण्यात आली आहे, तसेच एखाद्या महिलेने खोटी तक्रार नोंदवल्याचे सिद्ध झाल्यास तिलाही एक वर्षाच्या शिक्षेची तरदूत या कायद्याच असल्याचे देशमुख यांनी सांगितले.

३६ विशेष न्यायालये

शक्ती कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांचे विशेष न्यायालये स्थापन करण्यात येणार आहे. त्याकरिता लागणारे आवश्यक मनुष्यबळ आणि व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी ४५ कोटी रुपये उपलब्ध करून दिले जाणार आहेत.

असे झाले नामकरण

शक्ती कायदा करण्यापूर्वी महिलांच्या विविध संघटनांच्या प्रतिनिधींसोबत चर्चा करण्यात आली. सर्वपक्षीय महिला आमदारांसोबत चर्चा करण्यात आली. सर्वांचे मत घेतल्यानंतर या कायद्याला ‘शक्ती‘ असे नाव देण्यात आल्याचे देशमुख यांनी सांगितले.

जाणून घ्या -मदतीच्या बहाण्याने महिलेला बेशुद्ध करून केला अत्याचार; डॉक्‍टरविरुद्ध गुन्हा दाखल

महाआघाडी कायम राहील

पदववीधर निवडणुकीत आम्ही महाआघाडी करून लढल्याने विधान परिषदेच्या पाचपैकी चार जागा जिंकलो. नागपूर विभागीय पदवीधरमध्ये आघाडीचे उमेदवार अभिजित वंजारी यांनी इतिहास घडविला. त्यामुळे भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी आगामी सर्वच निवडणुका आघाडीने लढण्याचे सुतोवाच शरद पवार यांनीच केले आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस अशी आघाडी कायम राहील, असेही यावेळी अनिल देशमुख यांनी सांगितले.

संपादन - अथर्व महांकाळ 

loading image