
नागपूर : लावा येथील रहिवाशी दामोधर उर्फ चळवळीतील दामूदा शिवाजी मोरे यांचे निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी मुलगा आहे. दामूदा मोरे यांचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात देहदान करण्यात आले. सहा डिसेंबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झाल्यानंतर त्याची शहरभर दामूदा यांनी लाऊडस्पीकरवर माहिती प्रसारित केली होती.