esakal | नृत्य साधना करा अन् शरीर ठेवा निरोगी, जगभरामध्ये उपचार पद्धती म्हणून वापर

बोलून बातमी शोधा

dance day

नृत्य साधना करा अन् शरीर ठेवा निरोगी, जगभरामध्ये उपचार पद्धती म्हणून वापर

sakal_logo
By
केतन पळसकर

नागपूर : कोणतीही कला ही आनंद देणारी असते. कलेचा आनंद कलाकाराबरोबरच इतरांना देखील मिळतो. नृत्य ही आपली पारंपरिक कला आहे. भारतीय शास्त्रीय नृत्याला अत्यंत यशस्वी आणि मोठा इतिहास आहे. त्यातील प्रत्येक क्रियेला सुरेख अर्थ आहे. मात्र, या नृत्य कलेचा उपयोग उपचार पद्धती म्हणून होऊ शकतो, हे आपल्याला माहिती आहे का? होय, हे खरे आहे.

हेही वाचा: "राहू द्या नं भाऊ.. वर्षभरापासून आम्ही अपमानच सहन करतोय"; कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करणाऱ्यांना उपेक्षेची वागणूक

कोरोना काळामध्ये अनेक रुग्णालयांनी नृत्याचा आधार घेत रुग्णाचे मन प्रसन्न ठेवल्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर बघितले जात आहेत. यावरून, वैद्यकीय क्षेत्राने देखील या काळात त्याचा उपयोग करून घेतल्याचे दिसते. शास्त्रीय नृत्य शिकण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे देखील आहेत. कोरोनावरील बातम्या ऐकून ऐकून वीट आला असल्यास नृत्य करण्याचा सल्ला संगीत क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ती देतात. नृत्य हा योगाचाच प्रकार असून यामुळे शरीराला व्यायाम मिळतो.

नृत्य केल्यामुळे माझ्या विद्यार्थ्यांना प्रत्येक वेळी मी आनंदी पाहते. नृत्य करताना शरीराच्या प्रत्येक अंगाचा वापर होतो. नृत्य हा योगाचा एक प्रकार आहे, असे म्हटल्यास हरकत नाही. मन शांत ठेवण्यास नृत्य उपयोगी आहे.
-रतनाम नायर, शास्त्रीय नर्तिका
नृत्यामुळे माणूस शारीरिक, मानसिक आणि भावनिक दृष्ट्या शरीराशी नाते जोडतो. यामुळे, कलावंतासह प्रेक्षकांना आनंद मिळतो. विदेशाप्रमाणे भारतात देखील उपचार म्हणून नृत्याचा वापर व्हायला लागला आहे.
-शमा भाटे, शास्त्रीय नर्तिका

हेही वाचा: दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण : अखेर एम. एस. रेड्डीला नागपुरातून अटक

आरोग्यदायी फायदे -

  • शास्त्रीय नृत्यात विविध हस्तमुद्रा केल्या जातात. त्यामुळे बोटांना चांगला व्यायाम मिळतो. या हस्तमुद्रांमुळे एकाग्रता वाढण्यास मदत होते.

  • नृत्य ही सादरीकरणाची कला आहे. त्यामुळे यात सादरीकरण, हावभाव यांना अतिशय महत्त्व आहे. शास्त्रीय नृत्यातील तोडे, तुकडे, परण, गतभाव, कवित्त, नवरस असे प्रकार करताना हावभावांना विशेष महत्त्व असते. त्यामुळे, चेहऱ्यांच्या स्नायूंना उत्तम व्यायाम मिळतो.

  • शास्त्रीय नृत्यातील हस्तक, पदन्यास करताना संगीतासह शरीरासोबत ताळमेळ साधणे गरजेचे असते. त्यामुळे, समतोलपणा राखायला मदत होते.

  • शरीराबरोबरच मनावर देखील ताबा राखता येतो.

  • उठण्याच्या, बसण्याच्या, उभं राहण्याच्या स्थितीला लक्षवेधी पद्धत प्राप्त होते.

  • नृत्याचे सादरीकरण करण्यातून आत्मविश्वास, संवाद कौशल्य वाढण्यासोबतच बहू आयामी होतो.

संपादन - भाग्यश्री राऊत