Bhushan Gavai : ‘वडिलांचा प्रवास प्रेरणादायी’; सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या कन्या करिश्मा यांची भावना
Karishma Gavai : सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या कन्या करिश्मा गवई यांनी विधी शिक्षणात आणि अध्यापनात आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. त्यांचा प्रवास नव्या पिढीला प्रेरणा देणारा आहे.
नागपूर : आज भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे नवे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती भूषण गवई यांनी शपथ घेतली. हा ऐतिहासिक क्षण त्यांच्या कुटुंबासाठी आणि विशेषतः त्यांच्या कन्या प्रा. करिश्मा गवई यांच्यासाठी अत्यंत अभिमानाचा आणि भावनिक होता.