
नागपूर : कोरोना काळात वडिलांचा मृत्यू झाला. आईने शेतमजूरी करण्यास सुरुवात केली. घरची आर्थिक परिस्थिती बेताचीच. मात्र, परिस्थिती बदलायची म्हणून कर्णबधिर स्वराजदीपने मेहनत करून बारावीच्या परीक्षेत ८१ टक्के गुण मिळवीत आईच्या आशेचा ‘दीप’ प्रज्वलित केला आहे.