nagpur medical hospital
sakal
नागपूर - गडचिरोलीवरून आलो जी.. मेडिकलमध्ये उपचार झाले. लाईट सुरु आहेत. मोफत लाईट मिळत असल्याने आलो जी.. येथे येण्यासाठी हजार रुपये खर्च होतात. पण तीन दिवसापासून लाईट मिळाले नाही, प्रायवेटमध्ये लाईटसाठी रुपये आणायचे कुठून?... मेडिकलमध्ये येण्यापरिस आता कॅन्सरच्या वेदना घेऊन घरीच मेलेलं बरं... ही व्यथा आहे, मेडिकलच्या कर्करोग विभागात उपचारासाठी आलेल्या महिलेची.