esakal | लसीकरणानंतरही मृत्यू? ग्रामीण भागातील धक्कादायक प्रकार; प्रशासनाचे मात्र कानावर हात

बोलून बातमी शोधा

death
लसीकरणानंतरही मृत्यू? ग्रामीण भागातील धक्कादायक प्रकार; प्रशासनाचे मात्र कानावर हात
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : कोरोनावर मात करण्यासाठी सरकारने लसीकरणाची मोहीम सुरू केली. परंतु लसीकरणानंतर ग्रामीण भागात काहींचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येते. प्रशासनाने मात्र याबाबत कानावर हात ठेवले आहेत.

हेही वाचा: नागपूर झाले नरकपूर! लोकप्रतिनिधींच्या केवळ घोषणाच; पालिका प्रशासन आणि महापौरांत समन्वयच नाही

पहिल्या टप्प्यात ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यात यश आले होते. परंतु दुसऱ्या टप्प्यात ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढत आहे. रोज हजारोंच्या घरात रुग्ण मिळत आहेत. दोन डझनपेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू होत आहे. गेल्या वर्षभरात आरोग्य यंत्रणा बळकट करण्यावर पाहिजे त्या प्रमाणात भर देण्यात आला नाही. त्याचा परिणाम आता दिसत आहे.

कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरण सुरू करण्यात आले. परंतु लसीशीकरणानंतर काहींचा मृत्यू झाल्याची चर्चा आहे. नागपूर शहरालगत भागात हे मृत्यू झाल्याचे सांगण्यात येते. पाचगाव भागात लसीकरणाचे कॅम्प उधळून लावल्याचे सांगण्यात येते. परंतु येथील जि.प. सदस्याचे पती संजय ठाकरे यांनी अशी घटना घडली नसून लसीकरणाला थंड प्रतिसाद असल्याने काही ठिकाणचे शिबीर रद्द झाल्याचे सांगितले. लसीकरणामुळे ताप येतो.

व्यक्तीत आधीच ताप असलेल्या व्यक्तीने लस घेतली आणि दुर्लक्ष झाल्यास अशा प्रकारची घटना होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे प्रशासनातील सूत्रांनी सांगितले. याबाबत मात्र प्रशासनाने मौन बाळगल्याचे चित्र आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर व अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. असीम इनामदार यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद दिला नाही.

हेही वाचा: नैसर्गिक आपत्तीनंतर बळीराजापुढे निर्माण झालं नवं संकट; जिल्ह्यात चोरट्यांचा प्रचंड धुमाकूळ

५० कोटी रुपये द्यावे

ग्रामीण भागात रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. जिल्हा परिषदेकडे मनुष्यलळही आहे. फक्त व्यवस्था अधिक बळकट करण्याची गरज आहे. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून ५०कोटी मिळाल्यास ही व्यवस्था बळकट करता येईल. त्यामुळे जिल्हा नियोजन समितीतून ५० कोटी दिले पाहिजे, अशी मागणी दुधाराम सव्वालाखे यांनी केली.

संपादन - अथर्व महांकाळ